भाजपा उद्योग आघाडीतर्फे नाशिक महानगरपालिकेला व्हेन्टिलेटर्स

भाजपा उद्योग आघाडीतर्फे नाशिक महानगरपालिकेला व्हेन्टिलेटर्स

भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीतर्फे नाशिक महानगरपालिकेला व्हेन्टिलेटर्स पुरवण्यात आले आहेत. भाजपा उद्योग आधाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक आणि मैत्री या सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रदीप पेशकार यांच्या पुढाकाराने हे व्हेन्टिलेटर्स पुरवण्यात आले. दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांच्या हस्ते हे व्हेन्टिलेटर्स वाटप करण्यात आले.

सारा देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झगडत असताना अनेक हात या कार्यात मदतीसाठी पुढे येत आहेत. एकीकडे सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु असतानाच अनेक व्यक्ती, संस्था आपापल्या परीने या लढाईत सहभागी होत आहेत. याचीच प्रचिती नुकतीच नाशिककरांना आली. नाशिकमधील व्यावसायिकांनी पुढे येते नाशिककरांसाठी मदतीचा हात दिला आहे.

हे ही वाचा:

ग्लोबल टेंडर बाबतही ठाकरे सरकार काखा वर करण्याच्या तयारीत

झीशान सिद्दिकींकडून शिवसेनेला इदी

सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?

ग्लोबल टेंडरच्या बाबतीत ठाकरे सरकार फक्त दिवस ढकलतंय

उद्योग मित्र संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील कंपन्यांनी कोरोनाविरुद्धची लढाई बळकट करण्यासाठी पुढे आले आहेत. उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष तसेच भाजपा उद्योग आघाडी चे प्रदेशाध्यक्ष श्री प्रदीप पेशकार व या मदत उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख श्री आनंदराव सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून विविध कंपन्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या माध्यमातून नाशिकमधील रुग्णालयांसाठी व्हेन्टिलेटर्स पुरवण्यात आले आहेत. दिंडोरीच्या खासदार डॉ.भारती पवार यांच्या हस्ते हे व्हेन्टिलेटर्स जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा शल्यचिकित्सालय अशोक थोरात यांच्याकडे सुपूर्द ककरण्यात आले.

उद्योग मित्र संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ॲडव्हान्स एंजाइम लि.चे श्री के एल राठी जिंदाल साॅ लि. चे श्री सिन्हा , इनोवा रबर प्रा.ली.चे श्री हेमंत बक्षी, एम एस एस इंडिया चे श्री मंगेश नाटाळ, नॅशनल रोबोटिक्स चे श्री अशोक खत्री व श्री केवलरामानी आधी उद्योजकांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. या निधीच्या उपयोगातून व्हेंटिलेटरर्स , ऑक्सीजन प्लांट व आयसोलेशन सेंटर आधी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Exit mobile version