काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर टीका टिप्पणी केल्याप्रकरणी संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. याप्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.
याप्रकरणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. या प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीसुद्धा काँग्रेसवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात यावेळी जोरदार बाचाबाची झाली.
मुंबई भाजपा अध्यक्ष @MPLodha,निवडणूक संचालन समिती अध्यक्ष @ShelarAshish, मुंबई भाजपा प्रभारी आ.अतुल भातखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेल्या तीव्र निदर्शनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्तेही उपस्थित होते. pic.twitter.com/r8e4pnWnNc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 28, 2022
अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी हा शब्द उच्चारल्याबद्दल भाजपकडून काँग्रेस आणि अधीररंजन चौधरी यांच्यावर निशाना साधला. अधीररंजन चौधरी यांच्या या वक्तव्यावरुन मात्र स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, काँग्रेस आदिवासी, गरीब आणि महिलांच्या विरोधात असल्याची टीका केली. यावेळी इराणी यानी काँग्रेसवर निशाना साधत म्हणाल्या की, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या आदिवासी आणि गरीब कुटुंबातील महिलेच्या पदाचा अनादर करून राज्यघटनेला धक्का पोहोचवण्याचे काम सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या काँग्रेसने केले असल्याची टीकाही करण्यात आली.
हे ही वाचा:
शाब्बास.. १७ वर्षांखालील जागतिक कुस्तीत सूरज चमकला!
भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
८ वर्षात ७.२२ लाखांना मिळाल्या नोकऱ्या
याप्रकरणी मुंबईत अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे.