वीज बिलाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक

वीज बिलाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक

भाजप वीज बिलाच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या वीज कनेक्शन तोडण्याच्या धमकीविरोधात आज भाजप संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन करत आहे.

“महाविकास आघाडी सरकारचा ७२ लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय ही मोगलाई आहे. आधी १०० युनिट माफ करणार असे सांगितले. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झाले? फक्त वाहवा मिळवून वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला. ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाले नाही तर मग ही लोक पैसे कसे भरणार? 72 लाख वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे.” असे भाजपचे सांगणे आहे. म्हणून भाजप आज राज्यभर या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत.

ऊर्जामंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बनवलेल्या कार्यालयाला आज त्यांनी कुलुप लावले. “हे दुर्दैव आहे, जनतेच्या हितासाठी मी आज या कार्यालयाला लॅाक करतोय, सरकार वीज बिल माफ करेपर्यंत भाजप शांत बसणार नाही. आज तालुका स्तरावरील महावितरण कार्यालयाला लॅाक केलंय, भविष्यात जिल्हा कार्यालयाबाहेर आंदोलन करु.” अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मुंबईतही अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत. कांदिवली, बोरिवली, भांडुपसह अनेक ठिकाणी पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना रोकल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version