अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार असल्याची चर्चा असतानाच अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांनी आता आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते.

विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर आदी नेते या आंदोलनाला उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार आणि नवाब मलिक यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करून आणी पोस्टर घेऊन हे आंदोलन केले जात होते. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, हे दाऊद सरकार आहे, अशा घोषणा भाजापा नेते देत होते. दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या. महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का? असे लिहिलेले पोस्टर घेऊन भाजपा नेते विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता

आता बाजारात येणार पतंजलीचे क्रेडिट कार्ड

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेचा थरार! भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध

बुधावर, २ मार्च रोजी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना कोणकोणत्या मुद्द्यांवरून घेरणार असल्याची कल्पना दिली होती. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपा नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्द्यांवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

Exit mobile version