भाजपाचा गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर ‘विश्वासघात’ मोर्चा

भाजपाचा गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर ‘विश्वासघात’ मोर्चा

मागील वर्षभराच्या काळात चार वेळा झालेली अतिवृष्टी, आलेली दोन चक्रीवादळे यामुळे नुकसान झालेल्या सामान्य मुंबईकरांना राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेकडून कोणतीही मदत न केल्याबद्दल मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबई महानगर पालिकेच्या विरोधात सर्व वॉर्ड ऑफिसवर ‘विश्वासघात मोर्चा‘ काढण्यात येणार आहे.  २०१७ च्या निवडणुकीवेळी ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचे मालमत्ता कर माफ करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याबद्दल, कथित हजारो कोटी रुपये खर्चून सुध्दा खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ मुंबई व २४ तास पाणी देण्याचे आश्वासन न पाळल्याबद्दल पालिकेचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

उद्या गुरुवार २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सर्व वॉर्ड ऑफिसवर सदर मोर्चा निघणार असून यात भाजपचे मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

बापरे! घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर पहिल्याच दिवशी मृत्यू

झकास! भारताच्या मधनिर्यातीची अशीही हाफ सेंच्युरी!

मंदिरे खुली करू नका, असे केंद्राने कुठे सांगितले?

शहरातील रस्त्यांवर फेरीवाल्यांचा फेरा!

मागील वर्षभराच्या काळात चार वेळा झालेली अतिवृष्टी, दोन वेळा आलेले चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या सामान्य मुंबईकरांना कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. २०१७ च्या निवडणुकीवेळी पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन स्वतः विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याचीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना मालमत्ता कर, पाणीपट्टी यांसह विविध करांत कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.  हजारो कोटी रुपये खर्चूनही मुंबईत झालेली रस्त्याची दुरवस्था हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक अपघातांना त्यामुळे निमित्त मिळत असून विविध विकारांनाही या खड्ड्यांमुळे निमंत्रण मिळत आहे. तरीही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या कारभाराच्या निषेधार्थ मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Exit mobile version