27 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरदेश दुनियाभाजपसोबत कोणतेही मतभेद नाहीत, पक्षाध्यक्षांची निवड लवकरच

भाजपसोबत कोणतेही मतभेद नाहीत, पक्षाध्यक्षांची निवड लवकरच

आरएसएस संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी केले स्पस्ट

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शनिवारी स्पष्ट केले की भाजपच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात संघ आणि पक्षामध्ये कोणताही मतभेद नाही. हा निर्णय पूर्णपणे भाजपवर अवलंबून आहे.भाजप अध्यक्षाची निवड लवकरच होणार आहे, ज्यामुळे या संदर्भातील चर्चा आणि अफवांना पूर्णविराम मिळेल.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (ABPS) बैठकीत, आरएसएसचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “संघाच्या ३२ संबद्ध संस्था स्वतंत्रपणे काम करतात. भाजपसह प्रत्येक संस्थेची स्वतःची निर्णय प्रक्रिया आणि सदस्यता रचना आहे.”

ते पुढे म्हणाले, “भाजप आणि आरएसएस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही समाज आणि देशाच्या हितासाठी एकत्र काम करतो आणि यापुढेही करत राहू. पक्षाची निवड प्रक्रिया सुरू आहे, सदस्य नोंदणी पूर्ण झाली आहे, आणि समित्यांची स्थापना झाली आहे. लवकरच भाजप अध्यक्षाची निवड केली जाईल.”

“थोडा वेळ वाट पाहा, सर्व स्पष्ट होईल”

त्यांनी पुढे स्पष्ट केले, “ही संपूर्ण प्रक्रिया भाजपच्या अंतर्गत संरचनेनुसार होईल. फक्त काही दिवस वाट पाहा, सर्व काही स्पष्ट होईल.”

सध्या, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन आणि खते मंत्री देखील आहेत. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

राष्ट्रीय एकात्मतेवर आरएसएसची भूमिका

आरएसएस नेते अरुण कुमार म्हणाले, “आपल्या राष्ट्रीय जीवनाची एक वेगळी ओळख आहे आणि प्रत्येकाने ती जपली पाहिजे. देशात अनेक भाषा आहेत, पण भावना एकसारख्याच आहेत. सर्व भाषांचा सार समान आहे.”

हे ही वाचा:

चित्रा वाघांचा षटकार उबाठाच स्टेडियमपार|

एका वाक्यात कचरा केला…

३९७७ जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा, मालेगाव महापालिकेचे उप निबंधक अब्दुल तवाब यांना अटक!

समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण

“आपली संस्कृती एकच आहे”

ते पुढे म्हणाले, “भारतात विविध धर्म, खाद्यसंस्कृती आणि परंपरा आहेत, पण मूल्ये एकसारखीच आहेत. ‘एक राष्ट्र, एक जनता’ हाच आपला विश्वास आहे. त्यांनी असेही सांगितले, “ब्रिटीश काळात निर्माण झालेल्या त्रुटी दूर कराव्या लागतील. आपले संविधान ‘आम्ही भारताचे लोक’ असा संदेश देते. हाच शब्द आपली खरी ओळख आहे आणि यामुळे धर्म, भाषा, प्रांत यातील मतभेद संपतात.”

त्यांनी पुढे सांगितले, “देशाच्या भविष्यात समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. एक राष्ट्र केवळ महान नेत्यांमुळे महान बनत नाही, तर महान नागरिकांमुळे तो महान बनतो. आम्ही असा समाज घडवण्यासाठी कार्यरत आहोत.”

ते म्हणाले, “देशप्रेम, एकता, शिस्त, निःस्वार्थी सेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना वाढवण्याचे आमचे ध्येय आहे. जर समाज मजबूत झाला, तर कोणत्याही संकटाचा सामना सहज करता येईल.”

आरएसएस केवळ संघटना नाही, सामाजिक परिवर्तनाचे जनआंदोलन

त्यांनी स्पष्ट केले की, “संघटनाचा विस्तार केवळ संख्यात्मक वाढीपुरता मर्यादित नाही, तर तो समाजाच्या सामर्थ्याचा जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा