गुजरातमध्ये वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. भाजपा सलग चौथ्या विजयासाठी मोठे प्रयत्न करत आहे. यासाठी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्या गुजरात दौऱ्यामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
आज, २० सेप्टेंबर रोजी जे.पी नड्डा यांनी राजकोटमध्ये लोकप्रतिनिधींच्या अधिवेशनाला संबोधित केले आहे. जे.पी. नड्डा यांनी गांधीनगरच्या नभोई गावात नमो पंचायत सुरू केली आहे. यादरम्यान गुजरातमध्ये १४ हजारांहून अधिक नमो पंचायतींचे आयोजन केले जाणार आहे. जे राज्यातील सुमारे १५० विधानसभांमध्ये आयोजित केले जाणार आहे. याची सुरुवात जे.पी नड्डा यांनी गांधीनगरच्या नभोई गावातून केली आहे.
राजकोटहून जे.पी. नड्डा मोरबी शहरात जाणार आहेत, जिथे ते संध्याकाळी रोड शो करणार आहेत. त्यानंतर आज रात्री ८.३० वाजता गांधीनगर येथील ‘विरांजली’ कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमात कलाकार त्यांच्या गाण्यांद्वारे आणि नाटकांच्या माध्यमातून राष्ट्रीय वीरांना आदरांजली वाहणार आहेत. त्यानंतर बुधवारी जे.पी नड्डा गांधीनगर येथील पक्षाचे मुख्यालय श्री कमलम येथे भाजपाच्या राज्य युनिटच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत.
हे ही वाचा:
उत्तरप्रदेशमध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू
पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
तसेच बुधवारी दुपारी जे.पी नड्डा अहमदाबादच्या टागोर हॉलमध्ये प्राध्यापकांच्या सभेला संबोधित करून भाजपच्या विचारसरणीबद्दल बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. नड्डा हे राज्याच्या राजधानीत होणाऱ्या महापौर परिषदेच्या समारोप समारंभालाही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.