आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा

आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी भाजपा खासदार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना करण्यात अलेली अटक ही संविधानिक मुल्ल्यांचे हनन असल्याचा हल्लाबोल नड्डा यांनी केला आहे. तर अशा कारवाईला आम्ही घाबरत नाही असे देखील नड्डा यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. गोळवली येथून राणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राणे यांच्या अटकेवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. तर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही या अटकेचा निषेध करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘उद्धव ठाकरे ममतांसारखे विचारी, संयमी’

ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’

सॅटिस पुलाखालची अग्निरोधक यंत्रणा वायूवेगाने पळवली

हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र!!!

या कारवाई संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये नड्डा म्हणतात, “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. जन आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे हे लोक त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, प्रवास चालूच राहणार.”

तर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील पत्रकार परिषद घेत या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई ही लोकशाहीची पायमल्ली असल्याचे म्हटले आहे. हिंदू धर्मावर भाष्य करणाऱ्या शर्जील उस्मानीला अटक करण्यात आली नाही. संजय राऊत यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही असे म्हणत पात्रा यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे.

Exit mobile version