मुंबई महानगरपालिकेची पोल खोल करण्यासाठी म्हणून भाजपाने अभियान राबवले आहे. मात्र, या अभियानाच्या साहित्याची तोडफोड करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. चेंबूरमधील भाजपाच्या पोल खोल अभियानाच्या रथाची तोडफोड करण्यात आली आल्याचे समोर आले आहे. ही तोडफोड महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा संशय भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
या रथाची तोडफोड केलेल्या आरोपींना न पकडल्यास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. यामध्ये शिवसेनेचा हात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. तसेच संघर्ष निर्माण झाल्यास यासाठी पोलीस आणि सरकार जबाबदार असेल असेही ते म्हणाले. पोलीस रझा अकादमीच्या ईफ्तार पार्टीत व्यस्त आहेत. जनतेसाठी हे पोल खोल अभियान राबवले आहे, त्यामुळे ते व्यवस्थित पार पडू द्यायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. पोल खोल अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय म्हणून ही तोडफोड केलेली आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त
महापालिकेची पोल खोलच्या भीतीने शिवसैनिकांनी स्टेजची केली तोडफोड
मराठीहृदयसम्राट ते हिंदुजननायक
दरम्यान, कांदिवली येथे भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही आज महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, त्या पूर्वीच मध्यरात्री या पोल खोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे.