स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील कर्ज भाजपाने फेडले

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील कर्ज भाजपाने फेडले

एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या करावी लागलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर जवळपास २० लाखांचे कर्ज होते. या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला. यावेळी, अशा पद्धतीने दुसरा स्वप्निल लोणकर महाराष्ट्रात होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडील सुनील तात्याबा लोणकर यांना हा १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबीयांवर कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबीयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

हे ही वाचा:

परमबीर सिंग यांच्यासह ८ वरिष्ठ पोलिसांवर गुन्हा दाखल

चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार

चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित

चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू

कोकणातील परिस्थिती भीषण आहे. गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका आहे. यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Exit mobile version