22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणकष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये टाका - भाजपा

कष्टकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये टाका – भाजपा

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला असतानाच भारतीय जनता पार्टीकडून मात्र या लॉकडाऊनला विरोध करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत भाजपाने आपली भूमिका मांडली. बैठक संपल्यावर पत्रकार परिषद घेत भाजपाने पुन्हा एकदा आपली भूमिका राज्याच्या जनतेसमोर स्पष्ट केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांसमोर भाजपाची बाजू मांडली. मनात आले आणि लॉकडाऊन लावला असे चालणार नाही. सरकारला जर लॉकडाऊन लावायचाच असले तर आधी जनतेसमोर जाऊन यासंबंधीचा सर्वसमावेशक आराखडा मांडावा अशी मागणी भाजपाने केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. पण भाजपाने सरसकट लॉकडाऊनला विरोध दर्शवत राज्याच्या जनतेसाठी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. या विषयी प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे लॉकडाऊनचे संकेत, पॅकेजबद्दल मात्र मौन

ठाकरे सरकारचा पर्दाफाश… लसीच्या तुटवड्याच्या दावा खोटा

पश्चिम बंगाल निवडणूक: हिंसाचारात पाच तरुणांचा मृत्यू

जेव्हा उदयनराजे भिक मागायला बसतात

काय म्हणाले दरेकर ?
राज्य सरकारला जर लॉकडाऊन करायचा असले तर दोन घटकांचा त्यांनी विचार करायला हवा. एक म्हणजे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक आणि मजूर, कष्टकरी, कामगार असा हातावर पोट असलेला समाज. सरकारने व्यापारी, उद्योजक यांना आर्थिक पाठबळ द्यावे, कर्जासाठी त्यांना मदत करावी. जीएसटी आणि इतर करांमध्ये त्यांना सवलती द्याव्यात. तर कामगार, कष्टकरी वर्गाच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करावेत अशी मागणी भाजपाने केल्याची माहिती दरेकरांनी दिली. सरकारला लॉकडाऊन करायचा असले तर आधी एक सर्वसमावेशक आराखडा जनतेसमोर मांडावा अशी सूचना फडणवीस यांनी बैठकीत केल्याचे सांगण्यात आले आणि ही सूचना मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून त्यासंबंधीचे आश्वासन दिले असल्याचे दरेकरांनी सांगितले. तसेच राज्यातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती विरोधी पक्ष आणि जनतेसमोर सरकारने मांडवी. यात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर या सगळ्यांच्यी आवश्यकता, उपलब्ध साठा याविषयी सरकारने सांगावे अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा