दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाचा विरोध

मविआच्या काळात सय्यद यांनी भाजपा नेत्यांवर आणि मोदींवर आक्षेपार्ह विधाने केली होती.

दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला भाजपाचा विरोध

ठाकरे गटावर नाराज असलेल्या दीपाली सय्यद या शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र, भारतीय जनता पार्टीकडून दीपाली सय्यद यांच्या प्रवेशाला विरोध केला जातं आहे. भाजपाच्या महिला आघाडीकडून हा विरोध करण्यात आला असल्याची माहिती आहे.

भाजपा ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी हा विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती. त्यामुळे त्यांनी मोदी आणि भाजपाची जाहीर माफी मागावी, त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात यावा, असं मृणाल पेंडसे यांनी सांगितले आहे. अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दीपाली सय्यद ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून आपला लवकरच शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे दिपाली सय्यद यांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या प्रवेशाची तारीख वेळोवेळी पुढे ढकलली जातं आहे. तसेच शिंदे गटातील अनेक नेत्यांकडूनही सय्यद यांच्या प्रवेशाला अंतर्गत विरोध होतं असल्याची चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा:

सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात

गुजरातमध्ये काँग्रेसच्या १५ दिवसांत २५ रॅली

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

मुंबईसह ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल

महाविकास आघाडीच्या काळात दिपाली सय्यद यांनी भाजपा नेत्यांवर आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. पुढे दीपाली सय्यद यांनी त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांनी त्यावेळी ठाकरे गटावर आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

Exit mobile version