औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन चालू आहे. म्हणूनच छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ आणि जलील यांच्याविरोधात भाजप आज रस्त्यावर उतरले असून शहरातील टीव्ही सेन्टर भागांत संभाजी महाराज चौकात भाजपचे जोरदार निदर्शने केली आहेत. इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळून यावेळी, भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजी नगरला विरोध करणाऱ्या इमितीयज जलील यांच्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जलील यांच्याविरोधात आंदोलन कर्ते जय भवानी जय शिवाजी , छत्रपती शिवाजी महाराज कि जय, भारत माता कि जय, मुर्दाबाद मुर्दाबाद इम्तियाज जलील मुर्दाबाद , नही सहेंगे नही सहेंगे दादागिरी नही सहेंगे, इम्तियाज जलील यांचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय, अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. याशिवाय जलील यांच्याकडून वातावरण खराब करण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही भाजपच्या पदाधिकारी यांनी यावेळेस केला आहे. म्हणूनच जलील यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाण्याचा इशारा सुद्धा यावेळेस करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा
तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा
बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत
दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव
भाजप पक्षाप्रमाणे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा जलील यांना विरोध दर्शवला आहे. खुलताबाद इथे असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या , औरंगजेबाची कंबर काढून टाका, त्या कबरीची इथे काय गरज म्हणूनच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी मागणी याबाबतीत करणार असल्याचे त्यांनी या वेळेस सांगितले आहे. असेही शिरसाट पुढे म्हणाले आहेत.