भाजपा ही कोणत्याही कुटुंबाभोवती केंद्रित झाली नाही! सेवा, संकल्प, समर्पण हीच आपली मूल्ये

भाजपा ही कोणत्याही कुटुंबाभोवती केंद्रित झाली नाही! सेवा, संकल्प, समर्पण हीच आपली मूल्ये

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीला केले संबोधित

भारतीय जनता पार्टी ही कधीही कोणत्याही कुटुंबाभोवती केंद्रीत झालेली नाही. सेवा, संकल्प आणि समर्पण ही भाजपाची मूल्ये आहेत, असे उद्गार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपाप्रसंगी केलेल्या भाषणात काढले.

१२४ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य या कार्यकारिणीसाठी उपस्थित राहणार होते. विविध राज्यांतील अनेक मुख्यमंत्री आणि सदस्य या बैठकीला सामील होण्याची अपेक्षा आहे.

सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर, त्या-त्या राज्याचे सर्व प्रदेशाध्यक्ष, राज्य सरचिटणीस (संघटना) आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य त्यांच्या संबंधित राज्य पक्ष कार्यालयातून या बैठकीला उपस्थित राहणार होते.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वसामान्या लोकांमधील विश्वासाचा सेतू म्हणून कार्य करावे. आज भारताचे जगभरात कौतुक होत आहे, ते माझ्यामुळे नव्हे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लोकांचा जो विश्वास आहे, त्यामुळे हे कौतुके केले जात आहे. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहा, लोकांसोबत राहा, लोकांमध्ये मिसळा, लोकांचे प्रेम मिळवा. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून कार्यकर्त्यांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडली त्यामुळे आज भाजपा ही केंद्रस्थानी आहे.

मोदींनी सांगितले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवेची नवी संस्कृती दाखवून दिली आहे. कठीण काळात सेवा हीच सर्वोच्च स्थानी आहे हे लक्षात राहू द्या. सेवा हेच संघटन आहे, असा मंत्र मोदींनी दिला.

 

हे ही वाचा:

पाक नौदलाने केली भारतीय मच्छिमाराची हत्या

समीर वानखेडेंशी माझा संबंध नाही; क्रूझ प्रकरणातील सुनील पाटीलने उघडले तोंड

 महाराष्ट्रातले प्रश्न संपले; धनंजय मुंडेंच्या दिवाळी कार्यक्रमात नाचली सपना चौधरी

काय आहे भाजपाचे पुढील लक्ष्य?

 

ज्या राज्यांत निवडणुका आहेत, त्यासंदर्भातील सादरीकरणानंतर पंतप्रधान म्हणाले की, लोकांशी निगडित असलेल्या विषयांना भाजपा कार्यकर्ते हाताळत असल्यामुळे भाजपा लोकांचा विश्वास नक्कीच जिंकेल.

Exit mobile version