निलेश राणेंचा हल्लाबाेल
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ वर्तमानपत्रातील मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकेच्या बाणांचा मारा केला. ठाकरे यांच्या मुलाखतीवर शिवसेना आणि भाजपकडून सध्या पलटवार सुरू आहे. भाजपच्या नेत्यांनीही टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनीही ठाकरे यांच्यावर हल्लाबाेल करताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या चार पाच ठिकाणी जाऊन भाषा वापरत आहेत. ते भाषणात प्रत्येक गेलेल्या शिवसैनिकांना गद्दार म्हणत आहे.पण गद्दार म्हणून तुम्हीं योद्धा होत नाही तर ते सिद्ध करावे लागते अशी बाेचरी टीका केली आहे.
ठाकरे कुटुंब पैसे घेऊन गर्दी गोळा करते, असा गंभीर आरोप करत उद्वव ठाकरे यांनी फुटलेला पेपर सोडवला अशी खोचक टीका करतानाच राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व मवाळ आहे. या चिन्हासाठी एखादं रफ अँड टफ माणूस पाहिजे, जसे बाळासाहेब होते अशी टीका राणे यांनी केली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही असे सांगताच निलेश राणे यांनी त्यांना असं काही तरी लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका ते शोभेल. धनुष्यबाण शोभणारं नाही असा टोला लगावला.
पक्षाच्या नावावर जे काही सुरु आहे, ते दुर्दैवी
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच एक मुलाखत प्रसिद्ध झाली. यात त्यांनी पक्षचिन्हावर जो दावा केला जातोय, त्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, शिवसेना आणि धनुष्यबाण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. सत्याचा विजय होईल. पण पक्षाच्या नावावर जे काही सुरु आहे, ते दुर्दैवी आहे.