25 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरराजकारणकाँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे

काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे

Google News Follow

Related

मंगळवारी टूलकिटच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीकडून आक्रमकपणे काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राष्ट्रीय सचिव असणारे सुनील देवधर यांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची लक्तरे टांगली. काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे आणि प्रेतांचे राजकारण करत आहे असा प्रहार देवधर यांनी केला आहे.

१८ मे रोजी समाज माध्यमांवर एक टूलकिट व्हायरल झाले. काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हासहित असणार्या या टूलकिटमध्ये फारच धक्कादायक आणि वादग्रस्त मुद्दे मांडण्यात आले आहेत. कोविड काळात भाजपाविरोधी राजकारण कसे करावे आणि भाजपाला कुठल्या मुद्द्यांवरून आणि कशाप्रकारे लक्ष्य करावे हे या टूलकिटमध्ये सांगितले आहे. हे टूलकीट व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली असून त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार सुरु केले आहेत.

हे ही वाचा:

सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती

काँग्रेस देशाला बारबाद करायला टापली आहे
भाजपचे नेते आणि राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे. या व्हिडिओमध्ये सुनील देवधर म्हणतात, काँग्रेसचे हे टूलकिट निंदनीय आणि घृणास्पद आहे. किती वेळा काँग्रेस मोदीविरोध करण्याच्या नादात देशाचा विरोध करणार आहे? कितीवेळा विदेशी शत्रुंचा उपयोग करणार आहे? असे सवाल त्यांनी केले आहेत. घरभेदी काँग्रेस असे म्हणते की मोदीविरोधी मटेरियल विदेशी मीडियाला पोहोचवावे, त्यांच्या माध्यमातून मोदी आणि भाजपाची निंदा करून घ्यावी, त्यासाठी मर्जीतल्या पेड पत्रकारांना कामाला लावावे असे काँग्रेस सांगत आहे. मोदी विरोधासाठी काँग्रेस कुंभ मेळ्याला बदनाम करू पाहात आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांचे राजकारण करत आहे. प्रेतांचे फोटो काढावेत, ते हायलाईट करावेत असे काँग्रेस सांगत आहे. काँग्रेस या देशाला बरबाद करायला टपली आहे. काँग्रेस विदेशी एजंट आहे असे म्हणत देवधरांनी हल्लाबोल केला आहे.

सामान्य माणसे मेली तरी काँग्रेसला फरक पडत नाही
एकीकडे राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड सारख्या काँग्रेस शासित राज्यात पीएम केअर्स फंडातून दिलेले व्हेन्टिलेटर्स धूळ खात पडलेले आहेत, त्याचा उपयोग केला जात नाही आणि दुसरीकडे काँग्रेस पीएम केअर फंडाला लक्ष्य करून राजकारण करत आहे असे म्हणत देवधरांनी काँग्रेसच्या राजकारणाचा निषेध केला आहे. काँग्रेस देशभर आपल्या नेत्यांना कोविड बेडवर कबजा करायला सांगते आहे आणि पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्यांनाच ते बेड दिले जावेत असे सांगत आहेत. म्हणजे काँग्रेस बेड्सचेही राजकारण करत आहे. सामान्य माणसे मेली तरी काँग्रेसला फरक पडत नाही असे देवधरांनी म्हटले आहे. काँग्रेस इतक्या खालच्या पातळीला उतरल्ये की कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला इंडियन स्ट्रेन, मोदी स्ट्रेन म्हणायला सांगत आहेत. जेव्हा की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याला मनाई केली आहे आणि असे काहीही नसल्याचे म्हटले आहे. तर सगळ्यात शेवटी काँग्रेसला देशद्रोही पार्टी म्हणत त्यांनी हल्ला चढवला आहे.

काँग्रेस स्वतःच एक व्हायरस
एकीकडे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसचा निषेध करतानाच देवधर यांनी ट्विटमध्ये काँग्रेस स्वतःच एक व्हायरस आळ्सयाचे म्हटले आहे, तसेच साऱ्या देशाला ही गोष्ट ठाऊक असल्याचेही म्हटले आहे. गेली ७० वर्षे हा पक्ष या देशावर आपल्या गैर युक्त्या वापरत आहे आणि ही घटना (टूलकिट) हे त्याचे ताजे उदाहरण आहे असे देवधरांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा