‘काँग्रेसने द्वेषाचा शॉपिंग मॉल उघडला आहे’

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राहुल गांधींवर टीका

‘काँग्रेसने द्वेषाचा शॉपिंग मॉल उघडला आहे’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘प्रेमाचे दुकान चालवतो’ या वक्तव्यावर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी टीका केली आहे. ‘राहुल गांधी हे भारताची अभिमानास्पद कामगिरी पचवू शकत नाहीत. काँग्रेस हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडत असून ते प्रेमाचे दुकान चालवत नाहीत, तर त्यांनी द्वेषाचा एक मेगा शॉपिंग मॉल उघडला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

 

‘जेव्हा भारत नवा विक्रम रचतो, तेव्हा काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी भारताचा अभिमान पचवू शकत नाहीत. एकीकडे ते सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करतात, हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या बाता करतात आणि दुसरीकडे प्रेमाचे दुकान चालवत असल्याचे सांगतात. तुम्ही द्वेषाचा एक मेगा शॉपिंग मॉल उघडला आहे,” असे नड्डा म्हणाले. मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीवर आधारित पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

हे ही वाचा:

मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धक्कादायक! पुतण्याने बॉलला हात लावला म्हणून काकाचे बोट कापले

तेज प्रताप यादवांचा अजब तर्क, म्हणे बिहारमधील पूल कोसळायला भाजपा जबाबदार

गोव्यात भरणार वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी अमेरिकेतील तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातील भारतीय नागरिक, कार्यकर्ते, शैक्षणिक आणि अन्य तज्ज्ञांशी संवाद साधला. एका भाषणादरम्यान गांधी म्हणाले की, भारत अशा लोकांच्या गटाद्वारे चालवला जात आहे, ज्यांना वाटते की त्यांना सर्वकाही माहीत आहे. ते देवाजवळ बसून गोष्टी समजावून सांगू शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एक उदाहरण आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. ते म्हणाले की, सर्व काही समजणार्‍या लोकांचा एक गट आहे. ते शास्त्रज्ञांना विज्ञान, इतिहासकारांना इतिहास, लष्कराला युद्धशास्त्र समजावून सांगू शकतात. मात्र प्रत्यक्षात त्यांना काहीच समजत नाही,’ अशी टीका राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान केली होती.

Exit mobile version