सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले अशी जोरदार हल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आखलेल्या भाजपच्या मिशन १४४ आणि मिशन २५ या मोहिमांचा जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.
सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आणि ज्यांच्या विरोधात मा.बाळासाहेब नेहमीच लढले त्यांच्याच पाठीशी उभे राहिले. अशा लोकांना जनता कधीच माफ करणार नाही. असे सरकार राज्यात आले ज्याच्या प्रमुखाने आपल्या विचारसरणीशी तडजोड केली अशी जोरदार टीका नड्डा यांनी केली. पालघरमधील साधूंना मिळालेली वागणुकीच्या बाबतीत कोणत्या दबावामुळे उद्धव यांनी सीबीआय चौकशीतून माघार घेतली? असा सवालही नड्डा यांनी यावेळी केला . राज्यात आलेल्या नव्या सरकारच्या कामाचे नड्डा यांनी भरभरून कौतुक केले. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात ३.७५ लाख कोटी रुपयांची विदेशी थेट गुंतवणूक आल्याचे नड्डा यावेळी म्हणाले.
जे.पी. नड्डा यांनी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की , जेव्हा जग संकटाच्या काळातून जात आहे. प्रत्येक देश संकटात सापडत आहे. अशाही विपरीत परिस्थितीतही आपण पुढे जात आहोत. हे केवळ पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळेच. ब्रिटनसारखा देश ज्याने आपल्यावर २०० वर्षे राज्य केले.पण त्या देशाला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. आज जगात भारताची शान उगाचच नाही तर मोदीजींच्या धोरणांमुळे तर जगाचा दृष्टीकोन बदलला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
मोदीजी जेव्हा लाल किल्ल्यावरून ‘स्वच्छ भारत’बद्दल बोलले तेव्हा काँग्रेस नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली. का… कारण ज्या कुटुंबातून ते आले आहेत त्यांना भारताच्या दुःखाची कल्पना नाही . या वेदनेचा जर कोणी अंदाज लावू शकला तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी . आमच्या प्रयत्नांमुळे देशात १२ कोटीपेक्षा जास्त शौचालये बांधली गेली, महिलांना सुविधा मिळाल्या.अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, चीनची स्थिती तुम्ही पाहिलीच असेल. पण भारतात २२० कोटींपेक्षा अधिक लसी देऊन जनतेला सुरक्षा कवच देण्याचे काम आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केले आहे. आम्ही १०० देशांमध्ये कोरोनाची लस पोहोचवली आहे आणि ४८ देशांमध्ये ती मोफत उपलब्ध करून दिली आहे. आता भारत हा जगाकडून मागणी करणारा देश नाही तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली देणारा देश बनला आहे.
जेपी नड्डा यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आज मला या व्यासपीठावरून आकडेवारी मोजत आहे. … काँग्रेसचे कोणी अशा प्रकारे आकडेवारी देऊ शकतो का ? ही मोदीजींनी बनवलेली कार्य प्रणाली आहे ज्यामध्ये आम्ही आमचे ‘रिपोर्ट कार्ड’ सोबत ठेवतो. आम्ही जे बोललो ते आम्ही करून दाखवले आहे. विकासाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि विकासपुरुषाची ओळख म्हणजे नरेंद्र मोदी असेही नड्डा म्हणाले.