विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा कार्यकारिणीची महत्वाची बैठक

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा कार्यकारिणीची महत्वाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज सकाळी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोविड-१९ नंतर ही पहिलीच बैठक आहे. पुढील वर्षी मतदान होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणूक रणनीतीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

१२४ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित असणार्‍या या बैठकीत पंतप्रधान मोदी मुख्य भाषण करतील अशी अपेक्षा आहे. भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी सांगितले की, विविध राज्यांतील अनेक मुख्यमंत्री आणि सदस्य या बैठकीला सामील होण्याची अपेक्षा आहे.

“सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर, त्या-त्या राज्याचे सर्व प्रदेशाध्यक्ष, राज्य सरचिटणीस (संघटना) आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य त्यांच्या संबंधित राज्य पक्ष कार्यालयातून या बैठकीला उपस्थित राहतील.” असे भाजपाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

१३ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील तीन लोकसभा आणि २९ विधानसभेच्या जागांवरील पोटनिवडणुकीचे निकालही या बैठकीत चर्चिले जाण्याची शक्यता आहे. या निकालानंतर पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उत्तराखंड आणि गुजरातप्रमाणे तिथेही नेतृत्व बदल होणार का? असा प्रश राजकीय वर्तुळांमध्ये उपस्थित केला जात आहे.

मात्र ईशान्य भारतात, विशेषतः आसाममध्ये (५/५) चांगली कामगिरी करत सर्व नऊ जागा जिंकल्या आणि मध्य प्रदेशातही २/३ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी, सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमांबद्दल आणि गरीबांना मोफत धान्य पुरवणे आणि कोविड लसीकरण मोहिमेसारख्या गरीब समर्थक उपायांबद्दल प्रदर्शन आयोजित करेल. अशी बातमी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने दिली आहे.

हे ही वाचा:

त्रिपुरा ‘दंगलीं’प्रकरणी १०१ अकाउंटविरुद्द UAPA

पाकिस्तान शेकडो दहशतवाद्यांची सुटका करणार

PM मोदी पुन्हा अव्वल

नवाब मालिकांविरुद्ध सव्वा कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा

पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये २०२२ च्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. पंजाब वगळता या सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

Exit mobile version