उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील भाषणाचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाचार घेतला आहे. तसेच यावेळी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातील सभेत अगदीच मुळमुळीत भाषण केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वक्तव्य का केलं नाही? असा सवाल नारायण राणे यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राची एक इंचही जागा जाणार नाही, असाही त्यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे फक्त अडीच तास बसले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला आहे. ज्या राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना आदित्य ठाकरे यांनी मिठी मारली. मिठी मारत आदित्य ठाकरे त्यांच्या कानात वेल डन असं म्हटले असतील. आदित्य ठाकरे हे तर पिल्लू आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
सीमावादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी परखड भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राची एक इंचही जागा जाणार नाही. उद्योग धंदे राज्याबाहेर गेल्याचे म्हटले जातं आहे. पण उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात जे उद्योग गेले त्याबाबत कुणीही काही बोलत नाही. ज्या कंपन्या बाहेर गेल्या त्या कंपन्यांशी दीडवर्ष उद्धव ठाकरेच बोलत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात फक्त अडीच तासच खूर्चीवर बसले, असं मंत्रालयातील लोकांनी सांगिलते, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
हे ही वाचा :
महाराष्ट्राला मिळाला आणखी ७ हजार रोजगारनिर्मितीचा प्रकल्प
रेल्वे प्रवासी महिलेला दगडामुळे गमवावा लागला डोळा
जिओची मोबाईल सेवा ठप्प; इंटरनेट मात्र सुरु
उत्तर प्रदेशात मदरशातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद
कोरोना काळात ते मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले नाहीत. महाराष्ट्रावर हे आत टीका करत आहेत. मात्र, महाराष्ट्र आजही नंबर वन आहे. त्यांना फक्त टीका करता येते. तुम्हाला कौतुक करता येत नसेल तर टीका करताना पुराव्यांसह करा असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे यांना लगावला आहे.