ट्विट डिलिट केले तरी महापौरांची असभ्य अक्षरं कोरली गेली आहेत

ट्विट डिलिट केले तरी महापौरांची असभ्य अक्षरं कोरली गेली आहेत

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सध्या समाज माध्यमांवर चीड व्यक्त केली जात आहे. एका नेटकऱ्यासाठी वापरलेल्या अपशब्दामुळे महापौरांवर चौफेर टीका होत आहे. भारतीय जनता पार्टी मुंबईकडूनही महापौरांवर निशाणा साधला गेला आहे. ‘ट्विट डिलीट केलं असलं तरी मुंबईच्या प्रथम नागरिकांची ती असभ्य अक्षरं कायमची कोरली गेलीच’ अशी खरमरीत टीका मुंबई भाजपाने केली आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यावर तोफ डागताना मुंबई भाजपाने म्हटले आहे की, “लशींचे कॉण्ट्रॅक्ट कुणाला दिलं, असा प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकराला ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पक्षसंस्कृतीचं दर्शन घडवलंय. ते ट्वीट महापौरांनी डीलीट केलं असलं तरी मुंबईच्या प्रथम नागरिकाची ती असभ्य अक्षरं कायमची कोरली गेलीच.”

हे ही वाचा:

‘तुझ्या बापाला’…किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली

भेट लागी जिव्हारी

बारा आमदारांचे प्रकरण विचाराधीन, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

काय आहे प्रकरण?
बुधवार, २ जून रोजी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची ट्विटरवर जीभ घसरली. ट्विटरवर एका नेटकाऱ्याच्या साध्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा संयम सुटला आणि थेट त्यांनी त्या तरुणाचा बाप काढला. ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने मुंबईच्या ग्लोबल टेंडरशी संबंधित एक बातमी दिली होती. त्या बातमीची लिंक टीव्ही ९ मराठीच्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर करण्यात आली होती. त्यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर खात्याला टॅगही करण्यात आले होते. या बातमीवर व्यक्त होताना एका नेटकऱ्याने ‘कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले’ असा साधा प्रश्न विचारला. खरं तर या प्रश्नाची ना भाषा गैर होती, ना रोख चुकीचा होता. पण तरीही या प्रश्नाने महापौर किशोरी पेडणेकर पुरत्या संतापल्या. राग अनावर होऊन किशोरी पेडणेकर यांनी थेट ‘तुझ्या बापाला’ असे प्रत्युत्तर त्या तरुणाला दिले.

Exit mobile version