काका काका ओरडणाऱ्या घरकोंबडयाची राज्यभर चर्चा

काका काका ओरडणाऱ्या घरकोंबडयाची राज्यभर चर्चा

मुंबई भाजपाने ट्विटरवरून पुन्हा एकदा शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. एका कोंबड्याचा व्हिडिओ शेअर करताना मुंबई भाजपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. यात कुठेही उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख भाजपाने केला नसला, तरीही त्यांचा रोख मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडेच होता.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली असून या निवडणुकीत महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याचा भारतीय जनता पार्टीने निश्चय केला आहे. त्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, सत्ताधारी शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपा रोज सज्ज असते. सभागृहापासून ते समाज माध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणीच भाजपा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसते. मुंबई भाजपच्या ट्विटर खात्यावरून तर रोज विविध मुद्द्यांवरून शिवसेनेला लक्ष्य केले जाते.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांच्या विरोधात याचिका

मिग-२१ चा पुन्हा अपघात, स्क्वाड्रन लीडरचा मृत्यू

धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट

हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं

शुक्रवार, २१ मे रोजी अशाच एका साध्या बातमीवरून मुंबई भाजपाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. सांगलीतला एक कोंबडा सध्या समाज माध्यमांवर खूपच ट्रेंडिंग आहे. हा कोंबडा म्हणे ‘काका काका’ ओरडतो. याचीच बातमी एका वृत्तवाहिनीने केली. या बातमीचा व्हिडिओ शेअर करताना ‘राज्यात काका काका ओरडणाऱ्या एका घरकोंबड्यांची जास्त चर्चा आहे’ असे म्हणत मुंबई भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार चपराक लगावली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम घरीच असतात घराबाहेर पडून काम करत नाहीत अशी टीका त्यांच्यावर सदैव होत असते. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने हा चिमटा उद्धव ठाकरे यांना काढला आहे.

Exit mobile version