शिवसेना शासित मुंबई महापालिकेचा कोविड नियोजनाचा सावळा गोंधळ अजूनही थांबलेला नाही. मुंबई महापालिकेने शहरातील जम्बो कोविड रूग्णालये बंद केली आहेत. मुंबई महापालिकेच्या या कारभारावरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झाले असून त्यांनी महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. ‘हाच बिनडोक कारभार मुंबईकरांचा कडेलोट करणार आहे.’
मुंबई मॉडेलच्या नावाखाली मुंबई महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी असलेला शिवसेना पक्ष स्वतःची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असतानाच आल्या दिवशी या मॉडेलचा फोलपणा उघडा पडत आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी होत आहे असे कारण पुढे करत महापालिकेकडून मुंबई शहरातील जम्बो कोविड सेंटर्सना टाळे ठोकण्यात आले आहे. एकीकडे तज्ज्ञांकडून कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच तिसऱ्या लाटेतल्या लॉकडाऊनचे सूतोवाच केले आहे. असे असताना मुंबई महापालिकेकडून मात्र बेजबाबदारपणे जम्बो कोविड सेंटर्स बनाड करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, तसेच दहिसर आणि मुलुंड येथील सेंटर्सचा समावेश आहे. तर सेंटर्स बंद करण्यासोबतच मनुष्यबळ कमी करायचे आदेशही महापालिकेने दिले आहेत.
हे ही वाचा :
२६ जूनला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्का जाम आंदोलन
शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलन करू
भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही नाही !
अजित पवारांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
महापालिकेच्या याच कारभारावर मुंबईकर संतप्त झाले असून पालिकेवर चौफेर टीका होताना दिसत आहे. राजयातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडूनही या कारभाराबद्दल मुंबई महापालिकेला लक्ष्य करण्यात आले आहे. मुंबई भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मुंबई महापालिकेवर टीकास्त्र डागण्यात आले आहे. “तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी बहुधा पालिकेने जम्बो कोविड सेंटर बंद केले आहे. मुंबई महापालिकेचा हाच बिनडोक कारभार मुंबईकरांचा कडेलोट करणार आहे.” असे मुंबई भाजपाने म्हटले आहे.
तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी बहुधा पालिकेने जम्बो कोविड सेंटर बंद केले आहे. @mybmc चा
हाच बिनडोक कारभार मुंबईकरांचा कडेलोट करणार आहे. @OfficeofUT #corrupt_mcgm pic.twitter.com/nD07WNZZDm— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 18, 2021