28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणनालेसफाई, कचरा सफाईच्या नावाखाली तिजोरीचे सफाई

नालेसफाई, कचरा सफाईच्या नावाखाली तिजोरीचे सफाई

Google News Follow

Related

नालेसफाई आणि कचरा सफाईच्या नावाखाली मुंबई महापालिकेच्या फक्त तिजोरीची सफाई सुरू आहे असा घणाघात भाजपा मुंबई कडून करण्यात आला आहे. गेले काही दिवस मुंबईतील नालेसफाई आणि कचरा सफाईच्या मुद्द्यावरून भाजपा सातत्याने मुंबई महापालिकेला आणि सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करत आहे. तर भाजपाच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेच्या तोंडाला फेस येत आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेची सत्ता उलथवून महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपा सज्ज झाली आहे. त्यासाठी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेनेला जेरीस आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून होताना दिसत आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच पावसाळ्याच्या आधी होणाऱ्या कचरा सफाई आणि नालेसफाईच्या मुद्द्यावरून भाजपाने महापालिकेवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

भारताने पार केला २० कोटी लसीकरणाचा टप्पा

ठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय

रा.स्व.संघाच्या सेवाकार्याने कम्युनिस्टांना पोटदुखी

शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले

बुधवारी, २६ मे रोजी भाजपा मुंबईने ट्विटर खात्यावरून मुंबईच्या दादर भागातील साचलेल्या कचऱ्याची बातमी शेअर करताना ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे कर्तृत्व मुंबईतल्या प्रत्येक कोपऱ्यात झळकतंय. चौकाचौकात साठलेला कचरा पालिकेसोबत मुंबईच्या इभ्रतीची लक्तरंही वेशीवर टांगतोय. नालेसफाई आणि कचरा सफाईच्या नावाखाली फक्त तिजोरीची सफाई सुरू आहे.’ असा टोला मुंबई भाजपाने लगावला आहे.

या आधी मंगळवार २५ मे रोजीही एक व्हिडिओ आपल्या ट्विटर खात्यावरून प्रसारित करताना मुंबई महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचे वास्तव भाजपाने राज्यातील जनतेसमोर आणले होते. या व्हिडिओद्वारे भाजपाने नालेसफाईचे खरे वास्तव जनतेसमोर आणले. तर ‘मुंबईकरांच्या कराचा पैसा नक्की जातोय तरी कुठे?’ असा सवाल भाजपने विचारला आहे. कोट्यावधी खर्च नंतरही नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा दिसत असल्याचे भाजपने म्हटले आहे. हे महापालिकेच्या टक्केवारीच्या कारभाराचे पोस्टमार्टम असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा