भाजपा मुंबईने दिला इशारा
रामजन्मभूमी जमिनीच्या वादावरून भाजपा युवा मोर्चाने शिवसेनेला आवाज दिल्यानंतर मुंबईच्या महापौरांनी त्यांना शिंगावर घ्यायची भाषा केली. पण त्याला भाजपा मुंबईने त्यांना चोख उत्तर दिले आहे. भाजपा मुंबईने आपल्या ट्विटमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांना सुनावले आहे की, महापौरांच्या खुर्चीत बसून त्यांनी भाजपाला दमदाटी करणे सुरू केले आहे. पण असे हजार पोकळ दमबाज भाजप आणि रामभक्तांनी पाहिले आहेत. राममंदिराचं आंदोलन लाठ्या काठ्या झेलत सुरू झालंय. या धमक्यांनी भेकडसैनिक घाबरत असतील, आम्ही नाही.
रामजन्मभूमी जमिनीच्या खरेदीविक्रीसंदर्भात शिवसेनेच्या सामना मुखपत्रात बिनबुडाचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर भाजयुमोने शिवसेनाभवनावर मोर्चा काढून तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
हे ही वाचा:
आंबा-काजू बागायतीच्या उत्पन्नातून संचित-पूर्णिमाने दिला मदतीचा हात
‘ओवळा-माजिवडाचे आमदार हरवले’…ठाण्यात लागले बॅनर
भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू
ट्वीटरने कायदेशीर संरक्षण गमावलं, केंद्र सरकारची कारवाई
त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. तेव्हा महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार, असा दम भरण्याचा प्रयत्न आपल्या कार्यालयातूनच केला. त्यावर भाजपाने त्यांच्या या इशाऱ्याची खिल्ली उडविली.
महापौरांच्या खुर्चीवर बसून @KishoriPednekar यांनी भाजपला दमदाटी करणं सुरू केलंय. असे हजार पोकळ दमबाज भाजप आणि रामभक्तांनी पाहिलेत. राममंदिराचं आंदोलनच लाठ्या-काठ्या-गोळ्या झेलत सुरू झालंय. या धमक्यांनी भेकडसैनिक घाबरत असतील, आम्ही नाही. #जय_श्रीराम pic.twitter.com/zn9yzA0Goj
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 16, 2021
गेले काही दिवस रामजन्मभूमीतील जमिनीच्या खरेदीविक्रीवर शंका उपस्थित करत वाद उपस्थित केला जात आहे. त्याचे स्पष्टीकरणही रामजन्मभूमी ट्रस्टतर्फे देण्यात आले आहे. मात्र ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून हा घोटाळा असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस, सपा आणि आम आदमी पार्टीला एकप्रकारे समर्थन दिले. एकेकाळी हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मिरविणाऱ्या शिवसेनेने महाविकास आघाडीत गेल्यापासून राम मंदिराबाबत सातत्याने वादग्रस्त विधाने केली आहेत. बुधवारी तर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.