मुंबईतील कोरोना मृत्यूंच्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला, तर मुंबई भाजपाने किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर आक्रमक होत शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे.
गुरुवार, १० जून रोजी महाराष्ट्रातील अकरा हजार पेक्षा अधिक कोरोना मृत्यू हे पोर्टल वर नोंदवले गेले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. ही माहिती समोर आल्यावर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण या मृत्यूंची नोंद झाल्यानंतर राज्यातील कोरोना मृत्यूंची आकडेवारी ही १०% नी वाढणार आहे. यामुद्द्यावरून राज्य सरकार आणि प्रशासनावर टीकेचा भडीमार केला जात आहे.
हे ही वाचा:
‘कुत्रा इमानी असतो, तो भामट्यांवरच भुंकतो’
येत्या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील
दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्या; पालिकेचे दावे पडले उघडे
११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही
या न नोंदवलेल्या कोरोना मृत्यूंमध्ये मुंबईतील कोरोना मृत्यूंचाही समावेश आहे. पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या विषयावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोविड मृत्यूचा डेटा लपवला जात नाही. असा कोणताही डेटा मुंबईत लपवला गेला नाही. मुंबईत अशी कोणती नदीही नाही ज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह सोडले जातील. मुंबईत तीन ठिकाणी कोरोना मृत्यूंची नोंदणी केली जाते. त्यामुळे डेटा लपवला जाऊ शकत नाही असे पेडणेकर म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर यांच्या या प्रतिक्रियेवरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून मुंबई भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पेडणेकर यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘महापौर किशोर पेडणेकर मुंबईच्या नद्यांमध्ये प्रेतं तरंगत नसली तरी जिवंत माणसं मॅनहोलमध्ये पडून, पाण्यात बुडून आणि इमारती खाली दबून मरतायत, कारण एकच मुंबई महापालिकेची, शिवसेनेची टक्केवारी. तुमच्या खांद्यावर निष्पाप प्रेतांचे ओझे वाढतेय त्याची जरा चाड बाळगा’ असे मुंबई भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महापौर @KishoriPednekar मुंबईच्या नद्यांमध्ये प्रेतं तरंगत नसली तरी जिवंत माणसं मेनहोलमध्ये पडून, पाण्यात बुडून आणि इमारती खाली दबून मरतायत, कारण एकच @mybmc ची शिवसेनेची टक्केवारी. तुमच्या खांद्यावर निष्पाप प्रेतांचे ओझे वाढतेय त्याची जरा चाड बाळगा. https://t.co/36b9pl4tQ1
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 10, 2021