‘या माणसाच्या शब्दावर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकतो का?’

‘या माणसाच्या शब्दावर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकतो का?’

विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील कालचा गोंधळ ही काळीमा फासणारी घटना असा उल्लेख केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हेदेखील पत्रकार परिषदेत सोबत होते. त्यावर मुंबई भाजपाने एक जुना व्हीडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकतो का, असा सवाल उपस्थित केला आहे.

आज ज्या दोन पक्षांसोबत शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेत आहे, त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल शिवसेनेची आधीची भूमिका काय होती, हे उघड करणारा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत उद्धव ठाकरे म्हणतात, हे दोन पक्ष केवळ सत्तेसाठी मारुनमुटकून एकत्र आलेले आहेत. एक पक्ष तर काँग्रेसमधून फुटून सत्तेसाठी एकत्र आलेला आहे. हे उघड दिसते आहे. केवळ खुर्चीसाठी एकत्र येणारी ही माणसं आहेत. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर शिवसेना आणि वारकरी चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकत नाहीत का?

हे ही वाचा:

स्टॅन स्वामीचा पुळका

कृपा भैया… पावन झाले

ठाकरे सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेले

टक्केवारीच्या हव्यासापोटी चराचरातून वसुलीचा फॉर्म्युला

मुंबई भाजपाने हा व्हीडिओ ट्विट करत खरमरीत सवाल विचारला आहे की, ‘या व्हीडिओमध्ये दिसणारा चेहरा नीट पाहा. त्यांचे शब्द ऐका आणि छातीवर हात ठेवून सांगा की, या बोटावरची थुंकी त्या बोटावर फिरविणाऱ्या या माणसाच्या शब्दावर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकतो का? म्हणे काळीमा फासणारी घटना.

याला म्हणतात मी दिलेला शब्द कायम विसरतो, अशी टिप्पणीही करण्यात आली आहे.

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना भेटायला गेलेले असतानाचा हा व्हीडिओ असून बंडातात्या कराडकर आणि वारकऱ्यांबाबत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून काय भूमिका होती आणि आता मुख्यमंत्री म्हणून हीच भूमिका कशी बदलली आहे हेदेखील त्यातून स्पष्ट होते.

कोरोनाचे निर्बंध असतानाही पायी वारी करणाऱ्या बंडातात्या कराडकरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी मध्यंतरी ताब्यात घेतले होते. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांचा त्या व्हीडिओतील संवाद आणि आता बदललेला सूर याची तुलना करण्यात येत आहे.

यात उद्धव ठाकरे म्हणतात की, वारकरी शिवसेनेच्या सोबत राहणार का? असा प्रश्न मला विचारला तर मी हे सांगतो की शिवसेना वारकऱ्यांसोबत आहे. हा वारकरी पंढरीचा वारकरी आहे तसे आम्ही अन्यायावर वार करणारे आहोत. सरकारला जर थोडीशी जरी लाज असेल तर त्यांनी वारकऱ्यांवरच्या सर्व फिर्यादी मागे घ्याव्यात.

उद्धव ठाकरे म्हणतात की, जो वारकरी अन्यायाविरुद्ध पेटून उभा राहतो. त्यांची वारी पंढरीकडे जाते. मंत्रालयाकडे नाही. जो देवाला मानतो तो तात्यांसोबत आहे. त्यातूनच तात्यांना हे आश्वासन देऊ इच्छितो की, तुम्ही एकटे नाहीत सगळी शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे.

Exit mobile version