मुंबई भाजपातर्फे कोल्हापुरातील पुरग्रस्तांना मदत

मुंबई भाजपातर्फे कोल्हापुरातील पुरग्रस्तांना मदत

कोल्हापूर, दि. ३० जुलै – कोल्हापूरमधील पूरग्रस्ताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भाजपा दक्षिण मध्य मुंबईतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक कोल्हापूर येथे पाठवण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या शहराला पूरस्थिती निर्माण होऊन अनेक संसार पाण्यात बुडाले. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत व्हावी याकरता भाजप दक्षिण-मध्य मुंबईतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक पाठवण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज ते कोल्हापूर येथे दौऱ्यावर होते. त्या वेळेस दक्षिण मध्य मुंबईतर्फे पाठवण्यात आलेल्या ट्रकमधील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवडकर, सरचिटणीस विलास आंबेकर आदी मान्यवरदेखील उपस्थित होते.

हे ही वाचा:

अनिल देशमुख २ ऑगस्टला ईडीसमोर हजर होणार?

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

अनिल देशमुख यांची अटक निश्चित

वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यात पुर आल्यापासूनच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते हे मदत आणि पुनर्वसन कार्यात अग्रेसर असलेले दिसले. मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण अशा विविध ठिकाणहून मदतीचे ट्रक पुरग्रस्त भागात पोहोचले. तर अनेक ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून कम्युनिटी किचन्स सुरु करण्यात आली आहेत. अनेक भागात भाजपाचे कार्यकर्ते प्रत्यक्षपणे पुनर्वसनाच्या कामात सहभागी झालेले दिसत आहेत.

Exit mobile version