मुंबई भाजपाचे सचिव आणि महापालिकेतील शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेचे विश्वस्तरीय केम्ब्रिज शाळेत रुपांतर केले पाहिजे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यावरूनच कर्पे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. ‘केम्ब्रिजचा नवीन पेंग्विन कशाला?’ असे म्हणत कर्पे यांनी टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वातील मुंबई महानगरपालिका शाळांमधील मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी, बेंच, शौचालय इत्यादी अशा साध्या साध्या मूलभूत सुविधाही पुरवू शकलेली नाही. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहाची पुरेशी सोयही नाही जेणेकरून घाण पाण्याचा निचरा होईल. महापालिकेच्या शाळांकडे कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशी संसाधने नाहीत. अशा स्थितीत मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात एक केम्ब्रिज बोर्ड शाळा उघडण्याची कल्पना हास्यास्पद आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या टाळ्या मिळवण्यासाठी केलेली ही केवळ घोषणा आहे. यामुळे त्यांना फायदा होणार नाही.
हे ही वाचा:
दाऊद टोळीचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मृत्यू
खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी
अरबी समुद्रात नौकानयनपटूंनी भरली शिडात हवा
मुंबई महापालिकेचे वर्षाचे शैक्षणिक बजेट ३००० कोटी आहे. शिवसेना एवढी वर्षे महापालिकेत सत्तेत आहे. इतके वर्षात जे हजारो कोटी रुपये शिक्षणावर खर्च झाले ते जर पारदर्शकपणे खर्च झाले असते तर आज पर्यंत जागतिक दर्जाचे शिक्षण मुंबईकरांना नक्कीच देतां आले असते. तुमच्या ह्या सगळ्या “हवाई संकल्पना” मुंबईकरांच्या हक्काच्या निधीतून का? असा सवाल प्रतीक कर्पे यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेचे वर्षाचे बजेट ३००० कोटी एवढ्या वर्षे सत्तेत असताना हजारो कोटी रुपये शिक्षणावर जर पारदर्शकपणे खर्च झाले असते तर आज पर्यंत जागतिक दर्जाचे शिक्षण मुंबईकरांना नक्कीच देतां आले असते
तुमच्या ह्या सगळ्या “हवाई संकल्पना” मुंबईकरांच्या हक्काच्या निधीतून का ?
(२/२)
— Pratik Karpe (@CAPratikKarpe) September 8, 2021