भाजपा मुंबईच्या वतीने मंत्रालयाजवळ चक्का जाम आंदोलन करून आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार प्रहार करण्यात आला. यावेळी बोलताना मुंबई भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी ठाकरे सरकारने ओबीसी समाजाला बेसावध ठेवले, अशी टीका केली. ते म्हणाले की, सगळ्या महाराष्ट्रात १००० जागी हे ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनामुळे महाविकास आघाडीच्या सरकारचा पाया डगमगू लागला आहे. सरकारने ओबीसी समाजाला बेसावध ठेवून त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. ओबीसी समाजासाठी म्हणूनच भाजपा खुल्या मैदानात उतरली आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार आरक्षण देत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना शांत झोपू देणार नाही, असे लोढा म्हणाले.
हे ही वाचा:
गुन्हेगारी टोळ्यांची धुंदी उतरवणार एनसीबी
आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांची धरपकड सुरु
करावे तसे भरावे…नारायण राणे बरसले
तानाशाही नही चलेगी, ठाकरे सरकार हाय हाय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, सोनिया जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है अशा घोषणांनी मुंबई भाजपाचे मुख्यालय आणि मंत्रालयाचा परिसर शनिवारी दणाणून सोडला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपा नेते गिरीश महाजन, महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष राज पुरोहित, मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष आमदार तमिळसेल्वन हे आंदोलनात उतरले होते.
लढा ओबीसींचा संघर्ष भाजपाचा #OBCvirodhiMVA
https://t.co/IipeRLvMMR— BJP MUMBAI (@bjp4mumbai) June 26, 2021
यावेळी बोलताना भाजपा नेते आमदार गिरीश महाजन म्हणाले की, या आंदोलनासाठी आम्हाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. या सरकारमुळेच हे आरक्षण गमवावे लागले आहे. सरकारमध्ये आरक्षणाच्या बाबतीत कोणतेही एकमत नाही. मराठा आरक्षण असो, पदोन्नतीचा निर्णय असो, सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तीन जणांचे सरकार आहे, त्यामुळे तिघांचीही तोंडे वेगवेगळ्या दिशेने आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती आली आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा यशस्वीरित्या लढणार आहोत.