भारतीय जनता पार्टी मुंबईने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चपराक लगावली आहे. ‘सगळे नागरिकांनीच करायचे तर तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?’ असा सवाल मुंबई भाजपाने मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला आहे. शुक्रवार, २ जुलै रोजी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई भाजपाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकारच्या कारभारावरून त्यांना रोज धारेवर धरत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून भाजपा नेते तसेच पक्षाच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यांवरून टीकास्त्र डागले जाते. शुक्रवारी मुंबई भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून अशाच प्रकारची सडकून टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली फोटो आणि लिखित पोस्टच्या माध्यमातून मुंबई भाजपाने मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
हे ही वाचा:
भाजपवर आरोप केल्याशिवाय संजय राऊत यांना जेवणच पचत नाही
‘मा.मुं.चे ज्ञान अगाध’ भातखळकरांचा टोला
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी ६ जुलैला
सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू
भाजपा मुंबईने ट्विट केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या घोषणेची खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘माझे घर…सोसायटीची जबाबदारी’, ‘माझे राज्य…मोदींची जबाबदारी’, ‘ठाकरे सरकार…राजकीय बेजबाबदारी’ असे मुंबई भाजपाने म्हटले आहे. तर ‘मा.मू उद्धव ठाकरे तुम्ही कधी जबाबदार होणार?’ असा सवालही करण्यात आला आहे.
फोटो सोबत ट्विट करताना, “कोरोना, डेंग्यू, मलेरिया, हिवताप सगळं नागरिकांनीच रोखायचं. ते नाही केलं तर कारवाईची धमकी देणार आणि ठाकरे सरकार खंडणी वसुली आणि टक्केवारीच्या रकमा मोजत राहणार. सगळं नागरिकांनीच करायचं तर तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?” असा सणसणीत टोला मुंबई भाजपाने लगावला आहे.