महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक असतानाच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगत आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने राज्यातल्या बिघडलेल्या परिस्थिती वरून केंद्रसरकारकडे बोट दाखवत जबाबदारीपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या आरोपांना खोडून काढत मुंबई भाजपाने त्यांची बोलती बंद केली. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस पुन्हा एकदा तोंडावर आपटली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातली सर्वाधिक कोरोना रूग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी नियोजन करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला लाॅकडाऊनचा इशारा दिला. या परिस्थितीवरून राज्य सरकारवर चौफेर टीका होत असताना राज्यातले सत्ताधारी पक्ष मात्र केंद्र सरकारकडे बोट दाखवत जबाबदारीपासून पळ काढण्याच्या प्रयत्नात आहेत. शनिवारी असाच एक प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून करण्या आला.
हे ही वाचा:
सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात
मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख
इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड
महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला. “कोविड काळात राज्यातील भाजपा नेते पीएम केअर फंडसाठी पैसे जमा करत होते पण राज्यात लाॅकडाऊन लावल्यास पॅकेज राज्य सरकारने द्यावे अशी अपेक्षा करत आहेत.” असे म्हणत पीएम केअर फंडचे पैसे गेले कुठे असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.
कोरोनाच्या काळात भाजपचे महाराष्ट्रातील नेते राज्यभर फिरुन PM Care फंडासाठी हात पसरत होते. आता मात्र लॉकडाऊन केल्यास पॅकेज राज्याने जाहीर करावं असं म्हणत हात आखडता घेतायत.
पैसे मागतेवेळी पुढे असणारे हात
पैसे द्यायची वेळ आल्यावर मागे का जातात?PM Care फंडाचा पैसा नेमका गेला कुठे? pic.twitter.com/IRncw4b05z
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 3, 2021
याला मुंबई भाजपाच्या ट्विटर खात्यावरून उत्तर देण्यात आले आहे. पीएम केअर फंडातून सर्वाधिक व्हेंटिलेटर देण्यात आल्याचा संदर्भ देत “थोडी माहिती घेतली असती तल नेहमी सारखं तोंडावर पडण्याची वेळ आली नसती” असा टोला भाजपाने लगावला आहे.
ट्विट करण्यापूर्वी थोडी माहिती घेतली असती तर बरं झाले असते ! नेहमी सारखं तोंडावर पडावं नसते लागले !! https://t.co/6uGe6vwHcj pic.twitter.com/RVuaoh3Yld
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) April 3, 2021