उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर कठोर प्रहार केला.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले की, आजकाल उद्धव ठाकरेंच्या सभा म्हणजे पूर्वी गावात महिला येऊन रडत असत तशी अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे हे रडके आहेत. त्यांना स्वतःचे विचारही नाहीत, धोरणही नाहीत.
उद्धव ठाकरे यांनी चांद्रयान ३च्या यशस्वी मोहिमेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. मोदी हे चंद्रावर घरे देण्याचे आवाहनही करतील अशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली होती. त्यावर शेलार म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या जमापुंजीतून उद्धवजींनी मातोश्री २ बांधले आता उरलेल्या पैशातून चंद्रावर मातोश्री ३ बांधणार का? चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यावर तुम्ही शुभेच्छा दिल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांची अवस्था शोलेतल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर. आम्हाला घरकोंबडा बोलायचे नाही कारण आमची तशी संस्कृती नाही. पण त्यांनी मर्यादेत राहावे.
शेलार म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत उद्धव ठाकरेंना सन्मान होता. पण आता INDIA आघाडीत त्यांना पाय धरावे लागत आहेत. स्वतःच्या पदलालसेपोटी ते पायघड्या घालत आहेत.
हे ही वाचा:
देशात लघुसिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
एनएसईत ५० लाख लोक गुंतवणूक करत होते आज ती संख्या ७.५ कोटी
दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी
दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी
शेलार यांनी संजय राऊत यांच्या विधानाचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे कर्ज सनी देओलप्रमाणे का माफ केले नाही असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता, त्यावर आशीष शेलार म्हणाले की, नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे राजकारण करू नका. त्यांच्या आरोपींना शिक्षा व्हायला हवी अशी आमची भूमिका आहे. पण तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी तरी गेला होतात का, परिवाराला भेटलात का. आम्ही हा विषय विधानसभेत मांडला आणि फडणवीसांनी तात्काळ त्यावर कारवाईचे आदेश दिले. पण ठाकरे गटाच्या आमदारांनी आपली भूमिकाही त्यावर व्यक्त केली नाही.