आज मुंबई भारतीय जनता पार्टीने तौक्ते चक्रीवादळाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आणि मुख्यमंत्री आरामखुर्चीवर असा सणसणीत टोला मुंबई भाजपच्या ट्विटर खात्यावरून लावण्यात आला आहे.
एकीकडे कोरोनाच्या संकटात राज्य होरपळून निघत असताना त्यातच राज्यावर तौक्ते नावाचे अस्मानी संकट आले. या वादळाचा फटका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील भागांना बसला. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर भाजपा नेत्यांनी कोकण भागाचा दौरा केला आहे. बुधवार १९ मे आणि गुरुवार २० मे अशा दोन दिवसांचा हा कोकण दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाला यांनी भेट दिली. तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत.
हे ही वाचा:
लसीकरणाचा गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने
मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा
डीएपीच्या भाववाढीला शरद पवार, मनमोहन सिंह जबाबदार
ठाकरे सरकारची ‘सोशल’ असहिष्णुता
इकडे विरोधी पक्षाचे नेते कोकण दौरा करत असताना मुख्यमंत्री मात्र घरात बसून आहेत असा आरोप भाजपाकडून पुन्हा पुन्हा होत आहे. फडणवीसांच्या दौऱ्यानंतर दौऱ्याचा देखावा करत मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी कोकण दौरा करणार असल्याचे भाजपाकडून म्हटले गेले आहे. याच सगळ्यात आता मुंबई भाजपाकडून उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार फटकेबाजी केली आहे.
विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी दौऱ्यावर
आणि आपले मुख्यमंत्री आरामखुर्चीवर… pic.twitter.com/N92etrwAOU— BJP MUMBAI (@bjp4mumbai) May 20, 2021