एकीकडे वाफा, दुसरीकडे तोहफा…

एकीकडे वाफा, दुसरीकडे तोहफा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेशी संवाद साधत जाहीर केलेल्या लसीकरणाबाबतच्या महत्त्वाच्या घोषणांसाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण हीच संधी साधत मुंबई भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे.

सोमवार, ७ जून रोजी देशाच्या जनतेशी संवाद साधताना देशातील कोविड १९ लसीकरणाशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले. देशभरातील लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारने आपल्या खांद्यावर घेतली असून येत्या २१ जूनपासून देशातील प्रत्येक राज्यांत १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत लस देण्याची महत्त्वांकाक्षी घोषणा पंतप्रधानांनी केली.

हे ही वाचा:

ईश्वर सेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?

पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त

सौ सोनार की, एक लोहार की

राज्यांच्या अपयशावर उतारा; सर्वांना मोफत लसीची मोदींची घोषणा

याबाबतच पंतप्रधान मोदींचे आभार मानणारे ट्विट मुंबई भाजपा कडून करण्यात आले आहे. पण त्याचवेळी त्यांनी मुख्यमनातरी ठाकरेंनाही चिमटा काढला आहे. ‘दोघांच्या लाईव्ह संवादातील फरक, एकीकडे वाफा दुसरीकडे तोहफा’ असे ट्विट मुंबई भाजपाने केलले आहे. यात कुठेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नमोल्लेख करण्यात आला नसला तरीही या ट्विटचा रोख त्यांच्याकडेच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह करण्यावरून विरोधक कायमच त्यांच्यावर टीका करत असतात. तर त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून काहीही ठोस हाती लागत नाही असाही आरोप विरोधक सातत्याने करताना दिसतात. तर अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह शैलीसाठी नेटकरी त्यांना ट्रोलही करताना पाहायला मिळतात.

Exit mobile version