23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणसंसद घुसखोर प्रकरण; भाजपचे खासदार प्रताप सिम्हा तिकिटाच्या प्रतीक्षेत!

संसद घुसखोर प्रकरण; भाजपचे खासदार प्रताप सिम्हा तिकिटाच्या प्रतीक्षेत!

नरेंद्र मोदींशिवाय मी काहीच नाही, प्रताप सिम्हा

Google News Follow

Related

लोकसभा निवणुकीसाठी भाजपकडून १९५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये अनेक नेत्यांचा समावेश नाहीये.त्यामुळे पुढच्या यादीत आपले नाव असेल अन आपल्याला निवणुकीसाठी तिकीट मिळेल या आशेने काही नेते प्रतीक्षेत आहेत.या प्रतिक्षेच्या यादीत भाजपचे म्हैसूर-कोडागूचे खासदार प्रताप सिम्हा हे देखील आहेत.दरम्यान, १३ डिसेंबर रोजी संसदेत घुसकोरी प्रकरणात भाजपचे खासदार प्रताप सिम्हा हे चर्चेत आले होते.

१३ डिसेंबर रोजी २०२४ रोजी दोन तरुणांनी संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी करून नळकांड्या फोडत घोषणाबाजी केली होती.त्यांनतर देशभरात एकच खळबळ उडाली.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाकडे प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेला प्रवेश पास सापडला होता.विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षावर टीका केली.त्यानंतर प्रताप सिम्हा यांच्यावर देशद्रोहाचा आरोपही करण्यात आला होता.यावर प्रताप सिम्हा म्हणाले होते की, लोकसभा २०२४च्या निवडणुकीमध्ये जनता ठरवेल की, मी देशभक्त आहे की देशद्रोही.

हे ही वाचा:

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

इंटरनेटवर ‘व्हॉट्स राँग विथ इंडिया?’ ट्रेंड!

‘मिसाइल राणी’; अग्नि-५ क्षेपणास्त्रामागील डीआरडीओची ताकद!

देशभरात १७ सप्टेंबर ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार

दरम्यान, लोकसभा निवणुकीसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली.मात्र, अजूनही नेते दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत.खासदार प्रताप सिम्हा हे देखील त्याच प्रतीक्षेत आहेत अन तिकीट मिळेल अशी आशा त्यांना आहे.त्यांनी स्वतः याबाबत ट्विटकरून माहिती दिली.राज्यसभा खासदार राधामोहन दास अग्रवाल यांच्या भेटीचा उल्लेख देखील ट्विटमध्ये केला.

प्रताप सिम्हा ट्विट करत म्हणाले की, “डॉ. राधामोहन दास अग्रवाल सरांसोबत माझी नुकतीच एक तासाची भेट झाली.मी सांगण्यापूर्वीच एकच सांगेन की, नरेंद्र मोदींशिवाय मी काहीच नाही.मला आशा आहे की, मला तिकीट मिळेल, अन्यथा मी पक्षासाठी काम करेन, धन्यवाद!, असे ट्विट प्रताप सिम्हा यांनी केले आणि डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला.दरम्यान, प्रताप सिम्हा यांनी दोन वेळा खासदारकी भूषविली आहे.मात्र, दोन वेळा खासदार असलेल्या सिम्हा यांच्या पुढच्या तिकिटासाठी भाजपचे म्हैसूर युनिट त्यांच्या विरोधात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा