भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

सध्याची रशिया युक्रेन युद्धाच्या परिस्थितीचा हॅकर्स गैरफायदा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जेपी नड्डा यांचे ट्विटर खाते काही वेळासाठी हॅक करण्यात आले होते. हॅकरने त्यांच्या खात्यावर एक ट्विट केले आणि प्रोफाइलचे नाव बदलून ‘ICG OWNS INDIA’ असे केले. हे सर्व करून थोड्या वेळाने त्यांचे खाते पूर्ववत करण्यात आले आहे.

नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर रशिया आणि युक्रेनला मदत करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. दुसऱ्या ट्विटमध्ये आम्हाला रशियाच्या लोकांसोबत उभे राहायचे आहे, असे म्हटले आहे. आता बिटकॉइन आणि इथरियम या क्रिप्टोकरन्सींचीही मदत घेतली जाणार आहे, असे म्हणत हॅक झालेल्या अकाऊंटवरून युक्रेनच्या मदतीबाबतही ट्विट करण्यात आले होते. एवढेच नाही तर पुढे, ‘ माझे खाते हॅक झालेले नाही, सर्व देणग्या युक्रेन सरकारला दिल्या जातील, असेही त्यात म्हटले होते. खाते पूर्वपदावर आल्यावर नड्डा यांनी हे सर्व ट्विट डिलीट केले आहेत.

हे ही वाचा:

‘२५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेत ३ लाख कोटींपेक्षा अधिक भ्रष्टाचार’

एल्फिन्स्टनचा उड्डाणपूल मराठी माणूस होणार का गुल?

मुंबईची बत्ती गुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर भारताची ही भूमिका

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही ट्विटर खाते हॅक करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे खाते पूर्वरत केल्यानंतर मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने हे प्रकरण हाती घेतले होते. तसेच पीएमओच्या सहाय्य्याने तात्काळ असे, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल काही काळासाठी हॅक झाले आहे. हे प्रकरण ट्विटरकडे नेण्यात आले आहे आणि अकाऊंटही रिस्टोअर आणि ताबडतोब सुरक्षित करण्यात आले आहे. हॅक झाल्यानंतर काही मिनिटांत काही ट्विट शेअर केले गेले आहेत, त्या ट्विटकडे दुर्लक्ष करा.” ट्विट करण्यात आले होते.

Exit mobile version