मागील महिन्यात पूर्ण महाराष्ट्रासह देशात गाजलेल्या कसबा पेठ पोट निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारसभेची क्षणचित्रे कोणीही विसरू शकणार नाहीत, कारण गेले अनेक दिवस आजारी असलेले भाजपचे खासदार नाकातोंडात नळ्या असून सुद्धा ते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. बुधवारी या लढवय्या नेत्याचे निधन झाले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते. पुण्याचे आमदार जगदीश मुळीक यांनी ट्विट करून बापट यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले. त्याआधी, त्यांना सकाळी १०.३० वाजता रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आले होते आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
बापट यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. संध्याकाळी ७ च्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मागे पुण्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरले होते. यावरून भाजप पक्षावर भरपूर टीका सुद्धा झाली होती. पण राजकारणासाठी आपले तन, मन अर्पण करणारे बापट हे खरे लढवय्ये नेते होते. असे त्या वेळेस भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. गेले अनेक दिवस आजारी असलेल्या गिरीश बापट यांची प्राणज्योत बुधवारी मालवली.
BJP MP from Pune City, Girish Bapat has passed away in Deenanath Mangeshkar hospital, says Pune BJP president Jagdish Mulik. https://t.co/MWoiWxjqcL
— ANI (@ANI) March 29, 2023
मागील महिन्यात भाजपचे विरोधी उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडणूक जिंकल्यानंतर सर्वात आधी गिरीश बापट यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यावरूनच बापट यांच्या राजकारणातील उमद्या व्यक्तिमत्वची जाणीव होते हे दिसून येते. बापट यांची ख्याती म्हणजे राजकारणातसुद्धा माणूसपण जपणारा असा नेता अशीच होती. गिरीश बापट यांचा जन्म तीन सप्टेंबर १९५० ला तळेगाव दाभाडे इथे झाला. १९७३ला टेलको कंपनीत ते कर्मचारी म्हंणून रुजू होऊन कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात आपले पाऊल टाकले. त्यानंतर १९८३ साली ते पुणे महापालिकेत सलग तीन वेळा नगरसेवक म्ह्णून निवडून आले होते.
कसबा पेठच्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. परत १९९५,,पासून सलग पाच वेळा कसबा पेठ निवडणुकीत आमदार म्हणून ते यशस्वी झाले. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि मंत्रिमंडळात सुद्धा काम केले आहे. खासदार म्हणून त्यांची कारकीर्द २०१९ ला सुरु झाली पण तेव्हाच त्यांना दुर्धर आजारपणाने ग्रासले होते पण तरीही ते आजारपणातसुद्धा राजकारणात सक्रिय होते.
हे ही वाचा:
मी आता डॉक्टर झालेलो नाही याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलीत
भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील ३० दिवस होणार १५ % पाणीकपात
हुश्श…आता ३० जूनपर्यंत करा पॅन आधारशी लिंक
नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभा निवडणुकीमध्ये बापट हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी ते व्हीलचेअर वर बसून नाकात नळ्या असताना सुद्धा आलेले बघितले होते. सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांचे राजकारणामधील वैशिट्य होते. कसबा गणपती समोर गिरीश बापट यांच्या खासदार निधीमधून विकास कामाच्या उदघाटनाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने याना आमंत्रित करण्यात आले होते. हेच गिरीश बापट यांच्या ४० वर्षांची राजकारणामधील यशस्वी कारकीर्दीचे रहस्य होते.