भाजपा खासदारावर हल्ला, तृणमूल काँग्रेसवर आरोप

भाजपा खासदारावर हल्ला, तृणमूल काँग्रेसवर आरोप

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ.जयंत कुमार रॉय यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवार, ११ जून रोजी सिलिगुडी या भागात त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी केल्याचा आरोप रॉय यांनी केला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा हा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत

मार्च आणि एप्रिल महिन्यात पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध तृणमूल काँग्रेस हा सामना चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला. पण या दोन्ही पक्षांच्या संघर्षामध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. २ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात सर्वत्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर, समर्थकांवर हल्ल्यांच्या मालिका सुरू झाल्या. या हल्ल्यांमध्ये भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांवरच तृणमूल पक्षाच्या गुंडांकडून हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हे ही वाचा:

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी

संभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये

स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचा सरमा यांचा सल्ला

या हल्ल्यांची मालिका अजूनही थांबली नसून शुक्रवारी भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ.जयंत कुमार रॉय यांच्यावर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला. सिलिगुडी या भागात संध्याकाळी ५ वाजल्याच्या सुमारास रॉय यांच्यावर हल्ला करण्यात आला. बांबूच्या काठ्यांनी रॉय यांच्या हातावर आणि डोक्यावर वार करण्यात आले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर काही लोकांवरही हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षावर टीका करताना ‘बंगालमध्ये कायद्याचे राज्य राहिले नाही’ असा घणाघात रॉय यांनी केला आहे.

Exit mobile version