27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण'वेडे समजता का? पाणीपुरवठा करण्यात काय अडचण?'

‘वेडे समजता का? पाणीपुरवठा करण्यात काय अडचण?’

Google News Follow

Related

कल्याण ग्रामीण भागातील २७ गावांना पाण्याची समस्या भेडसावत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांनी एकत्र येऊन आक्रमक भूमिका घेतली. पाणी प्रश्नावर कल्याण डोंबिवली महानगर पालिका (केडीएमसी) मुख्यालयावर मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन्ही आमदारांनी केडीएमसी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कल्याण ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावरून मनसेने आज, १८ एप्रिल रोजी केडीएमसी मुख्यालयावर ‘तहान मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चाला भाजपनेही पाठींबा दर्शवला. कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय मॉलपासून हा मोर्चा सुरू झाला यावेळी मनसे आणि भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केडीएमसी मुख्यालयावर मोर्चाने धडक दिल्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळ प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मुख्यालयात आले. परंतु या बैठकीला केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि एमआयडीसीचे मुख्य अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे दोन्ही आमदारांनी हजारो नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसी अधिकारी अजिबात गंभीर नसल्याची टीका केली.

लोकांचा प्रश्न, समस्या प्रशासन गांभीर्याने घेणार नसेल तर चांगलेच महागात पडेल. आपल्याला लाजा वाटायला पाहिजे, प्रशासकीय इमारतीला टाळे ठोकून बाहेर उभे राहू, बघू कोण येतं ते अशा शब्दांत उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना मनसे आमदार राजू पाटील यांनी इशारा दिला.

हे ही वाचा:

अमरावती, मुंबईनंतर बीडमध्येही धार्मिक कार्यक्रमात हिंसाचार

कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

लाऊडस्पीकरसाठी येणार राज्यात नव्या गाईडलाईन्स?

तर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी ही आपला त्रागा व्यक्त केला. प्रशासकीय कार्यवाही आम्हाला शिकवू नका, नको तो शहाणपणा करायचा नाही. आम्हाला तुम्ही काय वेडे समजता का? पाणी पुरवठ्याबाबत धोरणात्मक निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात काय अडचण आहे? असा संतप्त सवाल विचारत रवींद्र चव्हाण यांनी प्रशासकीय कारभारावर टीका केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा