29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणन्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील

न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील

Google News Follow

Related

पालघर मधील साधूंच्या हत्याकांडाला १६ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरानंतरही या प्रकरणात न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या विषयात भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली दिसत आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी मुंबईत साधू संतांच्या उपस्थितीत आंदोलन केले.

पालघरमधील साधू हत्याकांडाला १६ एप्रिल २०२१ ला पूर्ण झाली असून या प्रकरणात अजून कोणालाही शिक्षा झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार राम कदम हे १६ तारखेला सकाळी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरापासून मंत्रालयापर्यंत न्याय मागण्यासाठी जाणार होते. या संबंधी राम कदम यांना पोलीस परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही आपण १६ तारखेला सकाळी ८.३० वाजता आपल्या निवासस्थानापासून प्रस्थान करणार असल्याचे कदम यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्याप्रमाणेच राम कदम आणि त्यांच्या सोबत काही साधू संत हे मुंबई येथे पालघर हत्याकांडाच्या विरोधात आंदोलन करायला जमले. पण अखेर पोलिसांनी त्यांना जागीच रोखले आणि पुढे जाण्यापासून मज्जाव केला.

हे ही वाचा:

पालघर हत्याकांड:- एक वर्षानंतर

यंदाही ‘आभाळमाया’

नॅशनल हाऊसिंग बँकेच्या बोर्डावर सतीश मराठेंची नियुक्ती

रियाज काझीला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

काय आहे नेमके प्रकरण?
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात २ साधूंची निर्घृण हत्या झाली आणि त्याने सारा देश हादरून गेला. पालघरमधून दादरा नगर हवेली मार्गे गुजरातकडे हे साधू जायला निघाले होते. महंत कल्पवृक्ष गिरी महाराज, महंत सुशील गिरी महाराज असे हे दोन साधू आणि त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे असे तिघे जण होते. पण वाटेतच गडचिंचले गावात त्यांना ४०० ते ४५० लोकांच्या जमावाने दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. हा सगळा प्रकार पोलिसांच्या समोर घडला आणि पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असा आरोप सुरवातीपासूनच होत आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या प्रकरणात योग्य तो न्याय मिळालेला नाही. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असले तरीही या प्रकरणाच्या बाबतीत सरकारच्या भूमिकेबद्दल पहिल्यापासूनच संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकारमार्फत ही केस म्हणावी तितकी मजबूत करण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा