मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. यावरून विरोधी पक्षांनी राळ उठवली आहे. यातच भाजपाचे आमदार राम कदम यांनी देखील उडी घेऊन, अनिल देशमुख जर खरे असतील तर त्यांनी नार्को टेस्ट करून घ्यावी.
राम कदम यांनी म्हटले आहे की, जर ते खरे बोलत आहेत त्यांनी नार्को टेस्ट करून घ्यावी, सारे काही स्पष्ट होईल. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नार्को टेस्टला इतके घाबरत का आहेत? असे कदम यांनी विचारले आहे.
“परमबीर सिंह यांनी त्यांच्या बदली नंतर हे पत्र लिहीलं, त्यामुळे आपण त्यांचा हेतू लक्षात घेतला पाहिजे, त्यांच्यावर राजकीय दबाव काय असेल याचा विचार करायला पाहिजे.” असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
पाकिस्तानी बायको लपवणाऱ्या उमेदवाराला डाव्यांचे समर्थन
कंगना रानौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी नार्को टेस्ट करावी; भाजपा आमदाराची मागणी
आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना उद्देशून असे देखील विचारले की, शरद पवार यांना गृहमंत्र्यांनी काही धमकी दिली आहे का? ज्याच्यामुळे त्यांनी सिंग याच्या आरोपाबद्दलचे त्यांचे विधान बदलले.
राम कदम यांनी ट्विट मध्ये म्हटले होते की, अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी या बाबात निर्णय घ्यावा. परंतु थोड्याच वेळात रात्री शरद पवार यांनी देशमुखांना वाचवायला सुरूवात केली. सर्व देशाला हे जाणून घेण्याची इच्छा आहे, की दुपार पासून रात्री पर्यंतच्या वेळात असे काय घडले? ज्यामुळे शरद पवार यांना आपले वक्तव्य बदलावे लागले.
कल दोपहर शरद पवार ने अनिल देशमुख के बारे में कहा कि उन पर जो आरोप लगाए गए हैं, वो गंभीर हैं। इस पर सीएम निर्णय करें।
लेकिन कुछ ही घंटों बाद रात में शरद पवार देशमुख के बचाव में आ गए।
पूरा देश ये जानना चाह रहा है कि आखिर दोपहर से रात तक में क्या हुआ ? कि शरद पवार जी को अपना
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) March 22, 2021
क्या इसी वजह से शरद पवार जी को रात होते-होते ये कहना पड़ा कि देशमुख के खिलाफ कार्रवाई नहीं करेंगे ? #Vajhegang #Maharashtravasulisarkar
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) March 22, 2021
अशा तऱ्हेची तीन ट्वीट्स राम कदम यांनी केली आहेत. यातच एका ट्वीटमध्ये त्यांनी अनिल देशमुखांनी काही धमकी दिली आहे का असे विचारले आहे.