ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाने राज्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. अशातच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे विधिमंडळात दाखल होत असताना नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना चिमटा काढला आहे.

गुरुवार, २३ डिसेंबर रोजी विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू झाला. विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याच्या आधी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सभागृहाच्या बाहेर पायर्‍यांवर बसून सरकार विरोधात निदर्शने करत होते. शेतकऱ्यांना आलेली अतिरिक्त विजेची बिले आणि महावितरणाचा कारभार यावरून सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. विरोधी पक्षाच्या या आमदारांमध्ये नितेश राणे हे देखील होते.

हे ही वाचा:

माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी

दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाकडे पाठ?

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

भारताच्या शत्रूंवर कोसळणार ‘प्रलय’

अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सभागृहात दाखल होत होते. आदित्य ठाकरे सभागृहाकडे त्याच पायऱ्यांवरून जात होते जिथे विरोधी आमदार निदर्शने करत होते. अशातच नीतेश राणे यांची नजर आदित्य ठाकरेंवर पडली. आदित्य ठाकरे यांना पाहून नितेश राणेंनी ‘म्याव म्याव’ असा मांजरीचा आवाज काढायला सुरुवात केली. आदित्य ठाकरेंनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते विधिमंडळात दाखल झाले.

ठाकरे विरुद्ध राणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला जुना संघर्ष आहे. उद्धव ठाकरेंमुळेच नारायण राणे हे शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यामुळे आधी हा सामना उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे असा होता. पण आता उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि नारायण राणे यांचे चिरंजीव राजकारणात आल्यामुळे पुढच्या पिढीतही हा परंपरागत संघर्ष आल्याचे दिसत आहे. नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तसेच शिवसेनेवर तोफ डागत असतात.

Exit mobile version