चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation

चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation

चाळीसगाव येथील पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीचा पर्दाफाश झाला आहे. तपासणीच्या नावाखाली नाकाबंदी करून ट्रक चालकांकडून पैसे उकळण्याचे रॅकेट चाळीसगाव येथील पोलिसांच्या मार्फत सुरु होते. या सर्व वसुली रॅकेटचे स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले आहे.

चाळीसगाव मतदारसंघाचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांना गेले काही दिवस स्थानिकांच्या तक्रारी येत होत्या. चाळीसगाव येथील वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या घाटातून स्थानिक पोलीस पैसे घेऊन वाहतूक सुरु ठेवत होते. या तक्रारी आल्यानंतर मंगेश चव्हाण ह्यांनी या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे ठरवले.

त्यांनी स्वतः ट्रक ड्रायव्हरचा वेष धारण करत घटनास्थळी जायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी चेहरा लपवत ट्रक चालवत गेले. पोलिसांनी त्यांना अडवले आणि पैशांची मागणी केली. पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. पैसे दिल्यानंतर आमदार चव्हाण हे पोलिसांकडे २०० रुपये परत मागू लागले. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात हुज्जत सुरु होती. पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद होत होता.

हे ही वाचा:

भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

पहिल्या दिवसापासून परमबीर आणि शिवसेनेचे साटेलोटे!

पोलिसांनी शिवीगाळ करताच आमदार मंगेश गायकवाड हे ट्रकमधून खाली उतरले. आमदारांना बघून पोलिसांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मंगेश चव्हाण यांनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी पोलीस सरवा सर्व करणारी उत्तरे देऊ लागले. पण त्यावेळी उपस्थित असलेल्या ट्रक चालकांनी सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. पोलीस अधिकारी ट्रक सोडायचे हजार रुपये, पाचशे रुपये, अशी रक्कम घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व प्रकरणानंतर आमदार चव्हाण आक्रमक झाले असून या सर्व बाबतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार असल्याचे मंगेश चव्हाण यांनी संगीतले.

Exit mobile version