आणखी स्वप्निल लोणकर व्हावेत असं सरकारला वाटतंय का

आणखी स्वप्निल लोणकर व्हावेत असं सरकारला वाटतंय का

महाराष्ट्रभर सद्ध्या एमपीएससी भरतीचा मुद्दा चांगलाच गाजत आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. भारतीय जनता पार्टीचे धडाकेबाज आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

स्वप्निल लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला मार्ग आणखीन कुणीतरी निवडावा असे कदाचित या प्रस्थापितांच्या सरकारला वाटत आहे असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला आहे. अजित पवार सभागृहात म्हणाले होते की ३१ जुलैपर्यंत एमपीएससीची रिक्त पदे भरणार. तर बाहेरून येऊन त्यांनी घूमजाव करत आयोगावरील सदस्यांच्या जागा भरू असे सांगितले असल्याचे जाहीर केले. अजित पवार यांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचाच अर्थ त्यावेळी अधिवेशनात ते धडधडीत खोटे बोलले होते असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.

हे ही वाचा:

पूर्व आशियात कोरोनाची तिसरी लाट, भारतालाही धोका?

नरेंद्र मोदी करणार ‘हे’ ऐतिहासिक काम

झिका का आला पुण्यात?

महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

पुढे जाऊन पडळकर यांनी सरकारला सवाल केला आहे. आता ३१ जुलै उलटून गेली आहे. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या तर सोडाच पण सरकारने साध्या आयोगावरील सदस्यांची नियुक्त्या तरी केल्यात का? असा सवाल पडळकर यांनी केला आहे. या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरं बाळांच्या आमदारकी खासदारकीची पडली आहे. बाकी किती लवकर येतील आणि जातील याविषयी त्यांना काहीही पडलेली नाही असा हल्लाबोल पडळकर यांनी ट्विटरवरून केला आहे.

Exit mobile version