समाजकार्यामुळे सफाई कामगार झाला भाजपाचा आमदार!

समाजकार्यामुळे सफाई कामगार झाला भाजपाचा आमदार!

पाच राज्यातील निवडणुकांपैकी उत्तर प्रदेशची निवडणूक जास्तच चर्चेत राहिली आहे. भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार मोठ्या संख्येने युपीच्या घराघरात पोहोचले आहेत. यामध्येच युपीमध्ये निवडून आलेल्या सफाई कामगाराचा समावेश आहे.

भाजपाच्या तिकिटावर गणेश चंद्र चौहान हे धनघाटा मतदारसंघातून उमेदवार होते. चौहान यांनी भारतीय समाज पक्षाच्या ओम प्रकाश यांचा पराभव केला आहे. चौहान यांनी १० हजार ५५३ मतांनी प्रकाश यांचा पराभव केला आहे. चौहान यांना एकूण ८३ हजार २४१ मते पडली आहेत.

गणेश चौहान हे एक सफाई कर्मचारी आहेत.कोरोना महामारीच्या काळात ते रिक्षाचालकांसाठी पुरी भाजी वाटायचे. महामारीत ज्यांना गरज असेल त्यांना तात्काळ त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. चौहान यांना समाजकार्य करण्याची आवड आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना भाजपाने तिकीट दिले होते.

हे ही वाचा:

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत

नाटोच्या इतर देशांना झेलेन्स्की यांनी दिला सतर्कतेचा इशारा

विधानसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी केले योगींचे अभिनंदन!

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चौहान यांनी सांगितले की, भाजपा पक्ष आणि मतदारांनी एक संदेश दिला आहे की सामान्य कार्यकर्ता देखील उंची गाठू शकतो. बिहारमधील अनेक लोक संत कबीर नगरमध्ये राहतात. तिकीट मिळाल्यावर लोक मला भेटायला आले. ते भावूक झाले होते. ज्या दिवशी मी जिंकलो, त्या दिवशी मी ज्यांना मदत केली आहे असे अनेक लोक मला भेटायला आले होते. पंतप्रधान मोदींनी सफाई कामगारांना दिलेल्या सन्मानाचा उल्लेख करताना चौहान म्हणाले, ” पंतप्रधानांनी सफाई कामगारांच्या कामाचा गौरव करताना अनेक सफाई कामगारांचे पाय धुतले होते. आणि सफाई कर्मचारी कमी नसल्याचा संदेश पंतप्रधानांनी दिला होता.

Exit mobile version