सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देत ओबीसी समाजाचे आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. न्यायालयात ओबीसी समाजाची बाजू मांडायला सरकार कमी पडल्याचे म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ढाकरे सरकारच्या विरोधात तोफ डागली आहे. ‘महाराष्ट्रातील ओबीसी समाज ठाकरे सरकारचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
“नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारचे स्वप्न आज पूर्ण झाले. ओबीसी समाजावर अन्याय करणारा निघकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. राज्य सरकारच्या चुकीच्या अहवालामुळे आज सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला. तर राज्य सरकारने १३-१२-२०१९ च्या सुप्रीम कोर्टाचा निकालाप्रमाणे, तसेच ४ मार्चच्या निकालाप्रमाणे जर ट्रिपल टेस्ट करून जर अहवाल तयार केला असता. ओबीसी आयोगाला पैसा दिला असता, मानव संसाधन दिले असते तर मला वाटतं ओबीसी आरक्षण टिकलं असतं.
हे ही वाचा:
‘मलिक यांचा आणखी एका जमिनीवर कब्जा’
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाहीत
नवाब मलिक यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी
पण महाविकास आघाडी सरकारचे नेते नुसते बोलत राहिले. तीन महिन्यात डेटा तयार करतो म्हणून ओबीसी मंत्री छगन भूजबळ यांनी सांगितलं. पण काहीच केले नाही आणि त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले. आता ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना सोडणार नाही, सरकारला सोडणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणा विना निवडणूका होणार असल्यामुळे ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मतदान केल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही.