पुजा चव्हाण हीच्या कथित आत्महत्येप्रकरणी अजूनही संजय राठोडला अटक करण्यात आलेली नाही. त्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
हे ही वाचा:
पुजा चव्हाण हीच्या कथित आत्महत्येचा विषय भाजपाकडून सातत्याने लावून धरला गेला होता. विरोधी पक्षाच्या दबावामुळे वनमंत्री संजय राठोडला राजीनामा द्यावा लागला होता. मात्र संजय राठोड याचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवलेला नाही. त्यावरून आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यासंदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे.
संजय राठोड अजूनही मुख्यमंत्र्यांच्या हृदयात. राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांच्या खिशात (बहुदा फ्रेम करायला दिला असावा). राठोडने बंगला, गाडी सोडलेली नाही.
राजीनामा राज्यपालांकडे कधी पाठवणार? उद्धवजी खेळ पुरे, आता तरी न्याय करा, राठोडला अटक करा.@OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 3, 2021
भाजप कोअर कमिटी सदस्य संजय कुटे यांनी, संजय राठोड याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवावा, अशी जोरदार मागणी केली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी ‘राठोड यांचा राजीनामा कदाचित फ्रेम करायला दिला असेल.’ अशा शेलक्या शब्दात टिका केली.
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक १ मार्चपासून सुरू झाले आहे. विरोधी पक्षाकडून विविध प्रश्नांवर सरकराला घेरले जात आहे. वीज बिल, पुजा चव्हाण आत्महत्येचा तपास अशा विविध प्रश्नांवरून सरकारवर विरोध पक्षाने जोरदार हल्ले चढवले आहेत.