‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’

भाजप आमदार अतुल भातखळकर यांची खोचक टीका

‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली.उद्धव ठाकरे हे निलाजऱ्या माणसासारखं तोंडाला येईल बरगळत चालले आहेत.त्यांना मानसोपचाराची गरज असून त्यांना लवकरात लवकर चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवावं अशी त्यांच्या कुटुंबीयांना माझी विनंती आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.न्यूज-१८ लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना ते बोलत होते.

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी प्रचाराच्या निमित्ताने सर्व ताळतंत्र सोडून दिलेलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाला भेट दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची मुद्रा देशाच्या आरमाराची मुद्रा केली, छत्रपती शिवाजी महाराज यांचा भक्त असणाऱ्या आणि महाराजांच्या विचारावर चालून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी करणं याच अर्थ म्हणजे उद्धव ठाकरेंनी ताळतंत्र न्हवे तर लाज-लज्जा पूर्णपणे सोडलेली आहे.निवडणुकीच्या पराभवामुळे किती हताश झालेले आहेत ते त्यांच्या वक्तव्यामुळे दिसून येत.

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी चौथ्या भारतीयाला अटक!

लाल चौकाने बदलले रूपडे; फडकतोय भारताचा तिरंगा, नांदते शांतता, ग्रेनेड नाही, रक्त नाही

पीओकेत महागाईचा हाहाकार, नागरिक सुरक्षा दलासोबत भिडले, पोलिसाचा मृत्यू!

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे ‘काळू बाळूचा तमाशाच’

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आज पंतप्रधान मोदींजींच्या पाठीशी उभा आहे.४५ पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळतायेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांची बगल बच्चे बेताल, खोटी बडबड करत आहेत.१० वर्षांमध्ये एकही बॉम्बस्फोट या देशात झालेला नाही.उद्धव ठाकरे ज्या राहील गांधींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.त्या राहुल गांधींच्या काँग्रेसने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं पाप केले होत.याच राहुल गांधींनी हिंदू दहशतवाद असा बागुलबुवा उभा केला होता.त्यामुळेच उबाठाचे उमेदवार आज बॉम्बब्लास्ट मधील आरोपीना घेऊन प्रचार करत आहेत, अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कुर्वाळताहेत, असं अतुल भातखळकर म्हणाले.

औरंगजेबाचा मुद्दा निवडणुकीत कसा येऊ शकतो?, असा प्रश्न विचारला असता. यावर भातखळकर म्हणाले की, औरंगजेबाचा मुद्दा कोणी उपस्थित केला.औरंगजेबाच्या रस्त्याचे नाव कोणी बदललं?, तर ते पंतप्रधान मोदींनी बदललं.काँग्रेस, राहुल गांधी, प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबावर फुले उधळायचे काम केलं, यांच्याबरोबर युती करायला निघालेले हेच ते उद्धव ठाकरे.ज्या मोदींनी औरंजेबाने नाव पुसून टाकलं.उद्धव ठाकरे बेताल बडबड करत आहेत.यावेळीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता कठोरातील कठोर शिक्षा उद्धव ठाकरेंना दिल्याशिवाय राहणार नाहीत.हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं.उद्धव ठाकरेंना लवकरात-लवकर मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवावं अशी माझी त्यांच्या कुटुंबायांकडे विनंती आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

Exit mobile version