मेट्रो प्रकल्पाच्या वाढीव खर्चाबाबत आमदार भातखळकरांची टीका
मेट्रो कारशेडचा दोन बोगस पर्यावरणवाद्यांनी घोळ घातला. मेट्रो ३ च्या १० हजार कोटीच्या खर्चवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर येत आहे. याची जबाबदारी कोणाची मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री महोदय? तुमच्या अहंकाराचा भुर्दंड अखेर प्रवाशांच्या माथी येणार आहे, अशा कठोर शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मेट्रो प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चासंदर्भात टीका केली आहे.
कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो ३च्या कारशेडचा गुंता सुटण्याऐवजी आता आणखी वाढत चालला आहे. आता ठाकरे सरकारने मेट्रो ३ साठी पहाडी गोरेगावच्या जागेचा पर्याय तपासून पाहण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले आहेत. पण ती जागा पाणथळ असल्याने तिथे कोणतेही बांधकाम करता येणार नाही.
हे ही वाचा:
जनतेसाठी पैसा नाही, पण मंत्र्यांसाठी उभारणार आलिशान टॉवर
काश्मीरमधील गावात जेव्हा पहिल्यांदाच वीज पोहोचते…
पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत
तुम्ही खरंच स्वबळावर लढणार असाल तर आधीच सांगा
कांजुरमार्गची जागा उपलब्ध नसल्यामुळे आता अन्य पर्यायांचा विचार केला जात आहे. पण आता या सगळ्या विलंबामुळे मेट्रो ३ चा खर्च तब्बल १० हजार कोटींनी वाढला आहे. आधी हा खर्च २३ हजार १३६ कोटी इतका होता पण आता तो ३३, ४०६ कोटी इतका होणार आहे. मेट्रो ३ चे कारशेड आरेमध्ये बांधण्यात येणार होते. पण जंगल नष्ट करत तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ देणार नाही, असे म्हणत पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला. यासंदर्भात आंदोलन झाल्यानंतर आरेतील कारशेड रद्द केली गेली आणि कांजूरमार्ग येथे नव्या कारशेडसाठी जागा ठरविली गेली. तिथेच मेट्रो ६ ची कारशेडही बांधली जाणार आहे. पण ही जागा केंद्र सरकारची असल्याचा दावा केला गेल्यानंतर पुन्हा काम थांबले.
मेट्रो कारशेडचा दोन बोगस पर्यावरणवाद्यांनी घोळ घातला. मेट्रो३च्या १० हजार कोटीच्या खर्चवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर येतोय. याची जबाबदारी कोणाची मुख्यमंत्री @OfficeofUT आणि पर्यावरणमंत्री @AUThackeray महोदय? तुमच्या अहंकाराचा हा भुर्दंड अखेर प्रवाशांच्या माथी येणार आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 14, 2021
आता नव्या जागेचा शोध ठाकरे सरकारने सुरू केला आहे. त्यासाठी पहाडी गोरेगाव या जागेचा विचार सुरू केला असला तरी तिथेही आता पर्यावरणवाद्यांचा विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने अहंकारापायी आरे कारशेड प्रकल्पाला दिलेली स्थगिती आता अंगलट येऊ लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे.